देशात दिड हजारांपेक्षा अधिक फुलपाखरु आढळतात. सोलापुरात 80 पेक्षा जास्त फुलपाखरु आहेत. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. अधिक अभ्यास केल्यास शहरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातींच्या संख्येत वाढ होईल. मध गोळा करण्यासाठी लागणारे झाड (नेक्टर प्लांट), अंडी घालण्यासाठी लागणारे झाड (होस्ट प्लांट) असल्यास फुलपाखरांची संख्या वाढते. शहरात अशी झाडे कमी झाली आहेत. अनेक ठिकाणी घरासमोरील बागा काढून घरे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्वी सारखी दिसणारे फुलपाखरू आता शोधावी लागत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम होत आहे.
वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे अजीत चौहान यांनी शहरात आढळणाऱ्या फुलपाखरांचे फोल्डर प्रकाशित केले आहेत. या फोल्डरमध्ये शहरात सामान्यपणे आढळणाऱ्या ४० वेगवेगळ्या जातींच्या फुलपाखरांचे फोटो समाविष्ट केले आहेत. फोल्डर (माहिती पुस्तिका) बनविताना त्यांनी शहरातील विविध ठिकाणी फुलपाखरांचा शोध घेतला. मात्र, शहरात कमी व शहरापासून दूर असणाऱ्या जागेत फुलपाखरु जास्त आढळत असल्याचे निरीक्षण त्यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.




More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम