टेंभूर्णीत दोन गटात सलग दोन दिवस दोनदा मारामारी
टेंभुर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

थारने दुचाकीस्वाराला चिरडण्याचा प्रयत्न, १२ जणांवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल, तीन मोटारसायकली व थार गाडी फोडली
शिव निर्णय / टेंभुर्णी : टेंभूर्णी ता माढा येथील झिरपे वस्तीवर अज्ञात कारणावरून दोन गटांत सलग दोन दिवस मारामारीची गंभीर घटना घडली असून यामध्ये थार गाडीने एका स्कुटी चालकाला चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असताना संबंधित युवकाने प्रसंगावधानावरून गाडीवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. तर थार गाडीच्या काचा फोडल्या आहेत हा हाणामारी चा प्रकार सलग दोन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी बारा जणांवर दंगल केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झिरपे वस्तीवर हवालदार आणि देशमुख गटात हाणामारी झाली होती.यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संबंधित लोकं आले असता गावातील पुढारी व कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप करून वाद मिठवला होता परंतु १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेंबळे रोड जवळील बागवाले वस्तीजवळ रोडवर पुन्हा दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली यामध्ये महिंद्रा ठार क्रमांक एम एच १२ ई पी ०३०३ ने एका स्कुटी वर असलेल्या यु्वकाला थारने रिव्हर्स गाडी घेऊन जोरदार फरफटत आणले यावेळी युवकाने गाडीवरून उडी मारल्याने वाचला यानंतर दोन गटात जोरदार मारामारी, दगडफेक झाली. यामध्ये महिंद्रा थार युनिकॉर्न मोटारसायकल नंबर एम एच ४५ ए डब्ल्यू 0909,हिरो कंपनीची फॅशन प्रो तिचा नंबर एम एच ४५ ड्यु 6078, होंडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कुटी अशा चार गाड्यांवर दगडफेक करून फोडण्यात आल्या यावेळी प्रचंड दगडफेक होत होती यावेळी अजय हवालदार याने ११२ वर कॉल केल्याने पोलीस घटनास्थळी फौजफाटा घेऊन आल्यानंतर संबंधित मारामारी, दगडफेक करणारे पसार झाले.पोलिसांनी दोन्ही गटांनी तक्रार न दिल्याने पारस हवालदार, आप्पा आटकळे, अजय हवालदार, अमित देशमुख, अजित देशमुख, समाधान कोल्हे, निलेश देशमुख, रितेश देशमुख, किसन देशमुख, राहुल देशमुख, समाधान देशमुख, प्रतीक बंडू पाटील राहणार सर्व टेंभुर्णी तालुका माढा या बारा जणांविरोधात कलम 324 (5),194 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड करीत आहेत.

या हाणामारीत थार गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत तर तीन मोटारसायकलची ही मोडतोड केली आहे.यामध्ये हाणामारी करणारे युवक २० ते २५ वयोगटातील होते.
सदर गाड्यांची मोडतोड केलेले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.



