सोलापूर

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 117, तर शिक्षक मतदारसंघासाठी 76 मतदान केंद्रे

 

 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 117, तर शिक्षक मतदारसंघासाठी 76 मतदान केंद्रे

सोलापूर, : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहणार असून, 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. सोलापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाचे निवडणुका पारदर्शकपणे कोशन तर तुम्ही वातावरणात पार पाडण्याचे नियोजन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 117 मतदान केंद्रे असून, शिक्षक मतदारसंघासाठी 76 मतदान केंद्रे, अशी एकूण 193 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पदवीधर मतदारसंघात 49 हजार 732 मतदार, तर शिक्षक मतदारसंघात 15 हजार 306 मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रे आहेत. शिक्षक मतदारसंघासाठीही याच 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेसाठी पदवीधर मतदारसंघात 117 मतदान केंद्रांकरिता आणि शिक्षक मतदारसंघात 76 मतदान केंद्रांकरिता मतदान पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, वीज व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, सावली आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण-

मतदान प्रक्रियेसाठी मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण 13 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, रंगभवन, सोलापूर येथे होणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी दुसरे प्रशिक्षण, तर 22 ऑक्टोबर रोजी तिसरे प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ स्तरावर घेण्यात येणार आहे.

मतदान अधिकारी

निवडणूक प्रक्रियेसाठी पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले या निवडणूक निर्णय अधिकारी असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर हे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button