सामाजिक उपक्रम

श्री सिद्धेश्वर बँक सेवक मंडळातर्फे ‘शारदोत्सव’

सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिरात हास्य, संगीताची मैफल

 

श्री सिद्धेश्वर बँक सेवक मंडळातर्फे ‘शारदोत्सव’; हुतात्मा स्मृती मंदिरात हास्य, संगीताची मैफल

सोलापूर : सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळांच्या वतीने शारदोत्सव व्याख्यानमाला सोमवार, १२ ते शुक्रवार, १६ ऑक्टोबरदरम्यान हुतात्मा स्मृती मंदिर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते होणार असून, बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे आणि व्हाइस चेअरपर्सन सुचेता थोबडे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती राम शर्मा, नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक नवरात्र उत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करीत असून पहिले पुष्प सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी संगीत अभ्यासक डॉ. मृदुला डॉ. मृदुला दाढे दाढे ‘सुरांच्या पाऊलखुणा’ या विषयावर गुंफणार आहेत. या कार्यक्रमात नीलेश निरगुडकर यांचाही सहभाग असणार आहे.

मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी कवी वैभव जोशी कविता आणि मनमोकळ्या गप्पांमधून रसिकांशी संवाद साधतील. बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी

हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बालकवडे ‘शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

 

श्री सिद्धेश्वर बँक सेवक मंडळातर्फे 'शारदोत्सव'

‘महाराष्ट्र धर्म..’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान

शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. दीपक पवार ‘महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणूस’ या विषयावर विचार मांडून व्याख्यानमालेची सांगता करतील. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेला संजय घाळे, शिवशंकर हळगुणकी, प्रमोद नारायणकर, महांतेश बिराजदार, चंद्रकांत म्हेत्रे, राजेश कलशेट्टी, प्रभुलिंग गोटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button