सोलापूर

अतिरिक्त शिक्षकांची दिवाळी अंधारात

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच वेतन होणार

 

अतिरिक्त शिक्षकांची दिवाळी अंधारात ,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच वेतन होणार

सोलापूर : राज्यातील खाजगी शाळेतील जवळपास दोन हजार शिक्षक अतिरिक्त आहे. त्यांचे समायोजन अद्याप करण्यात आले नाही. अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा विशेष टॅब शासनाने बंद केला आहे. त्यामुळे त्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा झाले नाही या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच त्यांचे वेतन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात शिक्षक व पदवीधर निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्याच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांचे समायोजन होणे महिनाभर तरी शक्य नाही. त्यामुळे या शिक्षकांना वेतनासाठी डिसेंबरची वाट पहावी लागणार आहे. समायोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारीची असताना त्याचा फटका मात्र शिक्षकांना बसत आहे. अनेक शिक्षकांचे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च व दैनंदिन खर्च अशा अनेक आर्थिक समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभे आहेत. वेतन बंद झाल्यामुळे हा सर्व खर्च कसा भागवायचा? याचा प्रश्न शिक्षका समोर पडला आहे. सर्व शिक्षकांमधून याबाबत नाराजीचा सूर निघत आहे.तातडीने समायोजन करून वेतन अदा करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.शासनाने संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी असलेला ‘ऑथरायझेशन टॅब’ शालार्थ प्रणालीतून बंद केल्यामुळे अतिरीक्त शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
संचमान्यतेच्या प्रक्रियेत जे शिक्षक अतिरिक्त ठरतात, त्यांचे इतर शाळांमध्ये पूर्णपणे समायोजन होईपर्यंत त्यांच्या वेतनासाठी शालार्थ पोर्टेलवर एक विशेष ‘ऑथरायझेशन टॅब’ सुरू ठेवला जातो. मात्र, शासनाने हा टॅब बंद केल्याने मुख्याध्यापकांना या शिक्षकांची वेतन देयके ऑनलाईन तयार करता येत नाहीत. शालेय संहितेनुसार आणि नियमांनुसार, जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे दुसऱ्या शाळेत अधिकृतपणे समायोजन होत नाही, तोपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतूनच सुरू ठेवण्याची तरतूद आहे। कोणताही नवीन शासन निर्णय किंवा लेखी आदेश नसताना हा टॅब बंद करणे बेकायदेशीर असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. समायोजन प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्यामुळे अनेक शिक्षक अजूनही त्यांच्या मूळ शाळेत नियमित सेवा देत आहेत. तरीही टॅब बंद झाल्यामुळे त्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे
जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे शंभर टक्के समायोजन पूर्ण होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच वेतनाची जुनी पद्धत किंवा ऑथरायझेशन टॅब कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.

 

अतिरिक्त शिक्षकांनी दिवाळी कशी साजरी करायची ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले आहे. दिवाळी हा मोठा सण तोंडावर आलेला असताना वेतन थांबवल्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांनी दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे समायोजन होईपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे त्यासाठीचा विशेष टॅब सुरू करण्यात यावा. अतिरिक्त शिक्षकाच्या वेतनाचा टॅब सुरू करण्यात यावा यासाठी संघटनेच्या वतीने शिक्षण संचालक यांना निवेदन देण्यात आले आहे .

सुनील चव्हाण, प्रदेश महासचिव डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button