सोलापूर

शेतात पाणीदेताना महिलेशी गैरवर्तन व काठीने मारहाण

मंगळवेढा पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

शेतात पाणीदेताना महिलेशी गैरवर्तन व काठीने मारहाण; मंगळवेढा पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
​मंगळवेढा :
शेतातील मक्याला पाणी देत असताना एका ३० वर्षीय विवाहित महिलेला गाठून तिच्याशी अश्लील चाळे करणे, अंगाशी झोंबाझोंबी करून लज्जास्पद वर्तन करणे तसेच लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात पप्पू विठ्ठल बेद्रे (रा. बठाण, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मूळच्या सरकोली (ता. पंढरपूर) येथील व सध्या बठाण येथे वास्तव्यास असलेल्या पीडित महिला सकाळी आपल्या आईसोबत शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. पाणी वळवण्यासाठी त्या शेताच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेल्या असता, संशयित आरोपी पप्पू बेद्रे तेथे आला. आरोपीने “तू मला फोन का करत नाहीस? स्वतःला फार शहाणी समजतेस का?” अशी विचारणा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
​त्यानंतर त्याने बळजबरीने मिठी मारून अंगाशी चाळे करत महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. महिलेने विरोध करत आरडाओरड केल्याने संशयिताने शेवरीच्या झाडाच्या ओल्या काठीने महिलेच्या पाठीवर बेदम मारहाण केली.
शेतात पाणीदेताना महिलेशी गैरवर्तन व काठीने मारहाण
​नातेवाईकांच्या मध्यस्थीने सुटका
ओरडण्याचा आवाज ऐकून महिलेची आई आणि जवळच असलेले नातेवाईक तातडीने धावून आले व त्यांनी महिलेची त्याच्या तावडीतून सुटका केली.
​घटनेनंतर पीडित महिलेने कुटुंबियांसह मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी तिला उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पीडितेच्या जबाबावरून पप्पू विठ्ठल बेद्रे याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button