सामाजिक उपक्रम
मालन नांगरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त कीर्तन सेवा संपन्न

कै.मालन नांगरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त कीर्तन सेवा संपन्न
टेंभुर्णी : चव्हाणवाडी नांगरे वस्ती येथील अशोक नांगरे व नरहरी नांगरे यांच्या मातोश्री कै.मालन नामदेव नांगरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त ह भ प राहुल महाराज राजगुरू यवत यांचे सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत कीर्तन सेवा संपन्न झाली. ही कीर्तन सेवा समाप्तीनंतर पुष्पवृष्टी देऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. ह भ प राजगुरू महाराज यांनी आई-वडिलांवर किर्तन सेवा सादर करीत असताना येथील महिला व पुरुष यांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. महाराजांनी त्यांच्या शैलीमध्ये कीर्तन सेवा सादर केली. याचा लाभ चव्हाणवाडी व परिसरातील महिला पुरुषवर्गांनी घेतला असून या ठिकाणी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.



