रायगड

कर्जतच्या शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत घवघवीत यश

त्रिशा घोलप व निधी चौधरी यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड

 

कर्जतच्या शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत घवघवीत यश

त्रिशा घोलप व निधी चौधरी यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड

कर्जत : जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत कर्जत येथील शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. नेहुली, अलिबाग येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्षांखालील वयोगटात त्रिशा समीत घोलप हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर १७ वर्षांखालील वयोगटात निधी विजय चौधरी हिने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कौशल्याची छाप पाडली.

या दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे त्यांची मुंबई विभागीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

दोन्ही खेळाडूंचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापनाकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आगामी मुंबई विभागीय स्पर्धेतही या खेळाडू उत्तम कामगिरी करून शाळेचे आणि कर्जतचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button