सोलापूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

 

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

सोलापूर : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र केल्याप्रकरणी अटकेत असलेले वसीम शौकत खान वय 42, सागर गोविंद रजपूत वय 42 दोघे राहणार सोलापूर, व विजय बाबासाहेब गर्जे वय 48 राहणार पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांना मे. मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील शिंदे यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, राजेश भाऊसाहेब जाधव याने दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे अर्ज दाखल केला होता. परंतु रुग्णालयात केलेल्या चाचणी अंतर्गत त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर त्याने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे येथे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो दाखल करताना त्याने बनावट पत्ता असलेले आधार कार्ड जोडले होते. परंतु त्याची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व चार रुग्णालय सोलापूर यांच्या कार्यालयाकडू दिनांक 20 5 2026 रोजी प्रमाणपत्र दिले याची कोणतीही नोंद नसताना देखील राजेश जाधव बियाणे 45% अपंगत्वाचे दिव्यांग प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे प्राप्त करून ते पाटबंधारे विभाग अहिल्यानगर येथील कार्यालयात जमा केले. त्या आधारे पाटबंधारे विभाग येथे शासकीय नोकरी मिळून लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली असल्याची फिर्याद डॉक्टर ऋत्विक देविदास जयकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावरून पोलिसांनी तपासा दरम्यान एकंदर आठ जणांना अटक केली होती. वरील तिघांनी जामीनासाठी मे.न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड मिलिंद थोबडे यांनी युक्तिवादात, आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही, गुन्ह्याचा तपास पूर्णत्वास आलेला आहे, त्यामुळे आरोपींना कोठडीत ठेवल्याने कोणतीही फलनिष्पत्ती होणार नाही असा युक्तीवाद मांडला. त्यावरून मे. न्यायाधीशांनी प्रत्येकी एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

यात आरोपी तर्फे ऍड.मिलिंद थोबडे, ऍड.विनोद सूर्यवंशी, ऍड. पोर्णिमा निंगदाळे, ऍड रमण यल्ला, ऍड. सोबन मिर्झा तर सरकार तर्फे ऍड.अमोघसिद्ध कोरे व ऍड.वाघमारे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button