सोलापूर

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले अंबिका नगरच्या विध्यार्थ्यांचे स्वागत

 

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले अंबिका नगरच्या विध्यार्थ्यांचे स्वागत
सोलापूर – शाळेच्या प्रथम दिवसा निमित्त प्रवेशोत्सव मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर ता. उत्तर सोलापूरच्या विध्यार्थ्याचे स्वागत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी केले.अत्यन्त उत्साहपूर्ण वातावरणात हे कार्यक्रम संपन्न झाले.
  यावेळी नगरसेविका सौ अलका आनंद भवर फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, आनंद भवर पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ लक्ष्मी कनकधर उपाध्यक्ष प्रज्ञा राऊत मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 यावेळी बोलताना पोलीस आयुक्त मा.एम राजकुमार म्हणाले  आपल्याला जीवनात मोठे होण्यासाठी भरपूर अभ्यास करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांना मित्र बनवले पाहिजे. पुस्तकांशी मैत्री करून सरकारी शाळेत शिकून अनेकजण मोठ्या हुद्यावर काम करत आहेत.
        विद्यार्थ्यांमधील उत्साह शाळेचा हिरवागार परिसर प्रवेशोत्सवानिमित्त आनंदी वातावरण हे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम संधी निर्माण करते. याचे महत्त्व विद्यार्थ्यांना आज कळणार नाही परंतु वयाने मोठे झाल्यावर आजच्या दिवसाचे महत्व त्यांना नक्की कळेल.
यावेळी  पहिलीच्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्कुल बॅग, गणवेश, शूज व पाठ्य पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी विध्यार्थ्यांना सजविलेल्या जीप मधून विध्यार्थी मिरवणूक काढण्यात आली. विध्यार्थ्यां वर पुष्पवृष्ठी व औक्षण करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्याना गणवेश, पाठ्य पुस्तक वाटप करण्यात आले.आनंद भंवर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्याना वह्या वाटप करण्यात आले.
आनंद भंवर व इतर मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद सोलापूर चे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख व शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनीही उपस्थित राहून विध्यार्थ्यांना साहित्य वाटप केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सिद्धाराम माशाळे यांनी केले. सूत्रसंचालन शिवशंकर राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती रसिका बंदिछोडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक काळे, श्रीमती वैशाली गोंदकर, श्रीमती विद्या वरडुळे, शिवाजी वडते यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button