महाराष्ट्र

सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक यांच्या नांवावर होणार शिक्का मोर्तुब ?

पंढरपूर कॅरिडायर प्रकल्प आणि सोलापूर जिल्हयाला प्रशांत परिचारक यांच्या रूपाने मंत्री पद

 

सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक यांच्या नांवावर होणार शिक्का मोर्तुब ?

शिव निर्णय/सोलापूर सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या भाजपा व विरोधात उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार या बाबत चर्चेला रंगत चढत असुन थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.

अनेक वेळा अनेकांची नावे चर्चेत आली कांही वेळा राजेंद्र राऊत यांचे तर शहाजी पवार तर किरण देशमुख तर रश्मी बागल अशी अनेकांची नांवे चर्चेत आली परंतू आता उमेदवारासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. परंतु बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही विधान परिषदेसाठीचा उमेदवार अर्ज घेतल्याने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढल्याचे दिसत आहे.

२०१७ मध्ये भाजपाकडून प्रशांत परिचारक उमेदवार हो ते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील होते. संख्याबळ नसतानाही परिचारक यांच्या पाठीशी त्यावेळचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सुरेश हसापुरे या सर्व नेत्यांनी प्रशांत परिचारक यांना आमदार केले होते.

२०१७ आणि आता २०२६ मध्ये राजकीय वातावरण बदलले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्ह्यात भाजपचे २९६ च्या वर मतदार आहेत. त्यामुळे भाजपा मजबूत अवस्थेत आहे असे जरी वाटत असले तर हा सोलापूर जिल्हा असुन सोलापूर जिल्हयातील नेतृत्वच कोणाला विजयी करायचे या चर्चेला उधाण आले आहे.

दुसरीकडे प्रशांत परिचारक यांच्याच सोबत माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांच्या ना-वाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळाली. अनेक कार्यकर्त्यांनी शहाजी पवार यांना उमेदवारी द्यावी अशी सुद्धा मागणी ला वून धरली होती. तर दुसरीकडे राजेंद्र राऊत यांनी आपल्या बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या सर्व १८ जागा भाजपाच्या निवडून आणल्याने त्यांचेही नाव आघाडीवर दिसून आले.

दरम्यान परिचारक यांनी २०२१ च्या पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एकत्र केले हो ते. त्यानंतर पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत समाधान आवताडे यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी पक्षाकडे कोणतेही पद मागितले नाही, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पंढरपूरसाठी सुद्धा त्यांनी काही मागितले नाही. त्यामुळे तेच खरे दावेदार मानले जात होते.

दरम्यान प्रशांत परिचारक यांचे नाव जरी फायनल झाले असल्याचे बोलले जात असले तरी भाजपाकडून अचानक कोणतेही नाव समोर येऊ शकते अशीही चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

पंढरपूर कॅरिडायर प्रकल्प आणि सोलापूर जिल्हयाला प्रशांत परिचारक यांच्या रूपाने मंत्री पद मिळू शकते त्यामुळे परिचारक हे जिल्हयातील सर्वच पक्षा-तील आणि विराधकातील सर्वाचे सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचे नांव पक्षाला जाहीर करावे लागणार असल्याचे समजते.

भाजपा विरोधात नागेश अक्कलकोटे यांची उमेदवारी ही निश्चित झाल्याचे समजते. अक्कलकोटे हे जिल्हयाच्या राजकारणात सक्रीय झाले असुन त्यांना उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेची निवडणूक अटीतटीची होणार का तर जिल्हयात भाजपाची एक हाती असलेली संख्या भाजपाच्या विराधात जाणार का विधान सभा निवडणूकीत अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले असुन यामुळे विरोधकाच्या मतामधे फूट पडू शकते. शेवटी सोलापूर जिल्हयाच्या राजकारणात मोहिते पाटील आणि त्यांचे विरोधक जर एकत्र झाले तर कोणाचा गेम होणार याबाबत ही चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button