महाराष्ट्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाची जयंती होणार साजरी
विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाची ३०१ जयंती होणार ” महिलाराज ” साजरी
विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन
शिव निर्णय सोलापूर – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ जयंती सोहळयासाठी सोलापूरातील मध्यवर्ती महामंडळाची संपूर्ण कमान ही प्रथमच महिलांच्याच हाती देण्यात आली असून उत्सव अध्यक्षा म्हणून सौ. मनिषाताई केशव माने यांची निवड झाली आहे.उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी या महिलाच असून एक वेगळा आदर्श सोलापूरातील महामंडळाने महाराष्ट्रातील समाजासमोर ठेवला आहे.
अहिल्यादेवी जयंती स्थापना २८ मे रोजी सायं ७ वाजता समाजातील नूतन नगरसेवक व नगरसेविका यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रमासह दि. ३० रोजी राजमातेचा पाळणा कार्यक्रम ही संपन्न होणार आहे
या तीन दिवसात मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवीचे पूजन व दुग्धाभिषेक होणार आहे.
जगात युध्दजन्य परिस्थीतीमुळे देशात महागाईचा बकासूर आग ओकत आहे या संकट समयी आपणही जयंती उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येणार आहे
अहिल्यादेवी जयंती निमित्त यंदा मंडळातर्फे
चालू शैक्षणीक वर्षातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृध्दाश्रमात औषध गोळयाचे वाटप, लाडू वाटप, अन्नदान, झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम ई-रिक्षा सेवा प्रशिक्षण व स्वयंरोजगार उपक्रम महिलांसाठी मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजन
करण्यात आले असल्याची माहिती उत्सव अध्यक्षा सौ.मनिषाताई माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमांस पालकमंत्री जयकुमार गोरे,खा. प्रणिती शिंदे, खा. ज्योतीताई वाघमारे, आ. विजयकुमार देशमुख, आ.देवेंद्र कोठे, आ. सुभाष देशमुख, कुलगुरु विद्यापिठ प्रकाश महानवर यांच्यासह सोमपा महापौर ,उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सोमपा आयुक्त, , जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोलापूरातील विविध राजकीय पक्षीय नेते ,सामाजिक नेते,पत्रकार बांधव तसेच धनगर समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष वैशाली सातपुते कार्याध्यक्ष किरणताई माशाळकर, सेक्रेटरी अर्चनाताई बंडगर, खजिनदार निमिषाताई वाघमोडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
🟫🟫 🟫🟫
सामाजिक बांधीलकी जपत ” महिलाराज ” मंडळाने समाजातील महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय कामासंदर्भात येणाऱ्या अडचणी व तक्रारांचे निवारण करण्यासाठी दर रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत मध्यवर्ती महामंडळाचे महिला पदाधिकारी मार्गदर्शन करुन समस्याचे निवारण अहिल्याच्या लेकी करणार आहेत.

