सोलापूर
करमाळ्याच्या ४५ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत कोरले यश

करमाळ्याच्या ४५ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत कोरले यश
करमाळा :
पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अरिस्टो किड्स ऑफलाइन अबॅकस स्पर्धेत करमाळा येथील ‘मुथा नॉलेज फाउंडेशन’च्या ४५ विद्यार्थ्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, इतर राज्ये आणि चक्क परदेशातूनही विद्यार्थी आले होते. मात्र, करमाळ्याच्या बालचमूंनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले!
पाच मिनिटांत १०० गणिते !
या स्पर्धेचा नियम ७ मिनिटांत १०० गणिते सोडवण्याचा होता, पण करमाळ्याच्या हुशार विद्यार्थ्यांनी अवघ्या ५ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला! यामुळेच अकॅडमीला मोठ्या प्रमाणात ‘रँक’ आणि ‘शायनिंग स्टार’ अवॉर्ड्स मिळाले आहेत.
यानिमित बक्षीस वितरण सोहळा
११ एप्रिल रोजी यश कल्याणी सेवाभावी सदन येथे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गणेशजी करे पाटील, प्रमुख उपस्थिती प्रा. रामदास झोळ, प्रा.माया झोळ, डॉ. कविता कांबळे, डॉ. स्वाती बिले, प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. उत्तम विटुकडे, डॉ. सारिका विटुकडे.
डॉ. कविता कांबळे यांनी अबॅकसच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “अबॅकस हे केवळ गणित नसून ते मुलांच्या बुद्धिमत्तेला पैलू पाडणारे ‘ब्रेन जिम’ आहे. यामुळे एकाग्रता, वेग, आत्मविश्वास आणि दोन्ही मेंदूंचा विकास होतो.”
यशस्वी विद्यार्थ्यांची नामावली रँक मिळवलेले
सार्थक वनारसे, अनुष्का नलवडे, शर्वरी शिंदे, श्रावणी गवळी, सई पडवळे, शिवांजय सावंत, रिदम बोराडे, अक्षता कदम, शौर्य शिंदे, आर्यन जाधव, राजवी मोरे, स्वराली जाधव, शिवतेज कदम, समर्थ सूर्यवंशी, आदिती खरात, साई काळे, देवांशी शिंदे, अनन्या फंड, आहिल बागवान.
शिवम सूर्यवंशी, स्वरा पडवळे, राजवी मोरे, स्वरा सूर्यवंशी, चैतन्य मरोडकर, अभिराज यादव, साद बागवान, नमोकार शहा, मयंक गवळी, ऋषिराज लष्कर, सिद्दीक बागवान, आयुष नलवडे, शिवतेज कदम, सानवी राठोड, ओजस गांधी, प्रतीक सावंत, शिवराज ढवळे, शिवम ढवळे, कृष्णा माळी, शिवेंद्र गरड, कार्तिक शिंदे, शिवतेज जाधव, स्वानंद मोरे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेटरपेक्षा वेगाने गणिते सोडवून ‘लाईव्ह डेमो’ सादर केला, जो पाहून पालक थक्क झाले!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली जाधव आणि समीक्षा थोरे या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावीपणे केले.
विद्यार्थ्यांना संस्थापिका ज्योति मुथा मॅडम, स्मिता वनारसे मॅडम, गौरी मॅडम आणि राणी सावंत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



