DHARASHIV

अणदूरमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष – गुलाल फटाके आणि अभिवादन

आणदूरमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष – गुलाल फटाके आणि अभिवादन

अणदूर  : आणदूर (ता. तुळजापूर) येथे जयंती उत्सव कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या कडकडाटात आणि गुलालाच्या उधळणीत करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, आणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, भाजपाचे दीपक घोडके, दयानंद मुडके, बालाजी मोकाशे, साहेबराव घुगे, डॉ. बिराजदार, बालाजी घुगे, बाळकृष्ण घोडके पाटील, मलंग भैया शेख, लक्ष्मण चौगुले, शिवाजी कांबळे, पोलीस पाटील जावेद शेख, महताब इनामदार, कचरू शेख, असलम शेख, गुरुनाथ गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.जयंती उत्सवात गावातील हजारो आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटी, आणदूरचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष सोमनाथ कांबळे, खजिनदार महेश सूर्यवंशी, सहखजिनदार राजेंद्र कांबळे, सचिव नागनाथ कांबळे, मिरवणूक प्रमुख काकासाहेब चंदनशिवे तसेच नागनाथ सुरवसे, गणेश सूर्यवंशी, प्रदीप कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. एकूणच सामाजिक एकोपा आणि प्रेरणेचा संदेश देणारा हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button