24 मे रोजी धनगर समाज वधू-वर पालक परिचय मेळावा

*सोलापूरात 24 मे रोजी राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर पालक परिचय मेळावा*
*दि.20 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी.*
सोलापूर : सोलापूरात दहावा राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सुंदर मल्टीपर्पज हॉल नेहरूनगर बस स्टॉप शेजारी विजापूर रोड, सोलापूर येथे आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे सदस्य भाऊसाहेब चोरमले यांनी माहिती दिली.
या मेळाव्यामध्ये इच्छुक वधू-वरांची नाव नोंदणी मोफत असून घटस्फोट, विधवा, विदुर व सर्व शाखेतील समाज बांधवांनी नोंदणी करावी. समाज बांधवांनी आपल्या पाल्यांचा व नातेवाईकांच्या पाल्यांची दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी करावी. नोंदणी करीता रविंद्र नागणकेरी, संस्थापक अध्यक्ष (मो क्र. (9421041213) अध्यक्ष सुहास गडदे, (मो. क्र.9420490725) कार्याध्यक्ष उदय कुमार ठेंगले, (मो.क्र.9552586615) यांच्याशी संपर्क साधावा.
सदर मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात होईल. मेळाव्याच्या ठिकाणी समाज बांधवांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर मेळावा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. समाज बांधवांनी 20 एप्रिल पर्यंत आपल्या पाल्याची नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे
