सोलापूर

१० ऑगस्ट रोजी स्मार्ट मीटर च्या विरोधात सोलापूरात जेलभरो

१० ऑगस्ट रोजी स्मार्ट मीटर च्या विरोधात सोलापूरात जेलभरो

सोलापूर : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्यावतीने १० ऑगस्ट रोजी देशव्यापी कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, विडी कामगारांना किमान वेतन व रोख मजुरी मिळावी, स्मार्ट मीटरला कायदेशीर विरोध, प्रचंड वाढलेली महागाई, वाढती बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमती तसेच आरोग्य व शिक्षणाच्या वाढत्या खर्चाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

या मागण्यांसाठी सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, पाणी टाकी, शांती चौक, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे ‘जेल भरो’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.या आंदोलनाची सुरुवात दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयापासून होणार आहे.

सिटूचे राज्य उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली हा जेलभरो आंदोलन होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button