सोलापूर

निमगाव ( ह ) येथील जातीवादी अप्पा शिंदे यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे मागणीसाठी करमाळ्यात आमरण उपोषण सुरू

५० हजारांची लाच मागणाऱ्या मंडल अधिकारी कलेटवाड यांची चौकशी करा

निमगाव ( ह ) येथील जातीवादी अप्पा शिंदे यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे मागणीसाठी करमाळ्यात आमरण उपोषण सुरू
५० हजारांची लाच मागणाऱ्या मंडल अधिकारी कलेटवाड यांची चौकशी करा.

शिव निर्णय /करमाळा : मौजे निमगाव ( ह) येथील बांधाच्या हद्दी खुना कायम करण्याचा आदेश देणे व पुढील तारीख वाढवून देण्यासाठी ५० हजार ची लाच मागणारे सालसे ता करमाळा मंडल अधिकारी अमितकुमार कलाटेवाड यांची योग्य ती चौकशी करावी व निमगाव ( ह ) येथील अप्पा वसुदेव शिंदे यांनी आपल्या साथीदाराला सोबत घेऊन जातीवादी मानसिकतेतून गट नं ११९/२अ/१ मधील अर्धा ते पाऊण एकर उसाचे ट्रॅक्टर घालून नुकसान केले आहे.तरी निमगाव येथील जातीवादी अप्पा वासुदेव शिंदे यांचेवर ॲट्रोसिटी व मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक नागनाथ वाघमारे यांचे स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.यावेळी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button