सोलापूर

सोलापूर जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंद

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी केला भांडाफोड..

जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंद,

आरोग्य मंत्र्यांना डायलिसिस सेंटर दाखवल नाही

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी केला भांडाफोड..

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांच्या सोलापूर जिल्ह्यात आरोग्य यात्रा संपन्न होऊन एक आठवडा देखील उलटला नाही तोपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी मोठा भांडाफोड केला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर हे सोलापुरात आल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे,महिला ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ जयश्री ढवळे, आरोग्य अधिकारी डॉ कोपुरवाड यांना जय्यत तयारी करून चक्क आरोग्य मंत्र्याची दिशाभूल केली आहे. आरोग्य मंत्र्यांना नव्याने बांधलेल्या कॅथलॅब व आयसीयू दाखवून बाहेर आणलं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयात येऊन विविध वॉर्डना भेटून आणि रुग्णांना भेटून पाहणी केली. तब्बल दोन राज्य मंत्र्यांना माहितच नाही, सोलापूर जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डोईफोडे यांनी जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर दाखवले नाही.2 नोव्हेंबर पासून डायलिसिस सेंटर बंद आहे. आरोग्य मंत्र्यांनी डायलिसिस सेंटरची पाहणी केली असती तर मूत्ररोग आजार असणाऱ्या रुग्णांची खरी कैफियत समोर आली असती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला नेत्या विद्या लोलगे या बुधवारी सकाळी रुग्णाला भेटायला जिल्हा रुग्णालयात गेल्या असता, हा प्रकार समोर आला आहे. जवळपास 50 ते 60 रुग्ण डायलेसिससाठी आले पण त्यांना परत जावे लागले. रुग्णांचा वाढत रोष पाहून जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी यांनी अधिकृत माहिती देताना संगीतल, लवकरच डायलिसिस सेंटर सुरू होईल. या वेळी सि ए बिराजदार, शिवसेना महिला नेत्या अरुणा बेंजरपे उपस्थित होत्या.

तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांच्या काळात सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले, आणि उद्घाटन ही त्यांच्याच काळात झाले. सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत सेवा मिळावी यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करत आहे. सोलापूर जिल्हा रुग्णालयातील थाटामाटात उद्घाटन केलेल्या विविध स्पेशल वॉर्ड अनुदानविना ऑक्सिजनवर सुरू आहेत. सोलापूर जिल्हा रुग्णालयातील मोफत डायलेसिस अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याचं फलकच त्याठिकाणी लावण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button