विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी; उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन
सोलापूर, : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रेणी-२ व श्रेणी-३, केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळाने आज *मा. स्मिता पाटील मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर* यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी *मा. श्री. सचिन जगताप (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र), प्रदीप तांदळे सर, रामराजे मुसळे सर, शंकर थोरात सर, इंदलकर सर तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक* उपस्थित होते.
निवेदन स्वीकारल्यानंतर मा. स्मिता पाटील मॅडम यांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच पदोन्नती प्रक्रिया मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शिक्षकांनी प्रशासनाकडून पदोन्नतीचा प्रश्न प्राधान्याने सोडवून पात्र शिक्षकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



