बलात्कार प्रकरणी उच्च न्यायालयाने केला आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर
बलात्कार प्रकरणी उच्च न्यायालयाने केला आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर
सोलापुर— बलात्कार प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीता तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे घेण्यासाठी तिची आत्या चिंगुबाई शिवहर भोसले हिच्या घरी आले असता, आरोपी चिंगुबाई भोसले, तिचा नवरा शिवहर भोसले व त्यांची मुलगी काजल भोसले या सर्वांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. त्याचवेळी शिवहरने पीडितेच्या गळ्यावर चाकू ठेवून शेजारच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करून चिंगुबाई व काजल यांच्या मदतीने हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवले. काही वेळाने बाहेरून आलेल्या मोठ्या आत्याने तिची सुटका केली. पिडीतेला वेदना होत असल्याने आरोपी शिवहर व चिंगुबाई यांनी पिडीतेला दवाखान्यात नेले. त्यावेळेस संधी साधून पीडितेने रस्त्यावरील लोकांना मदत मागितली. लोकांच्या मदतीने पोलिसांनी तिला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पिडीतेने आरोपी शिवहर भोसले, चिंगुबाई भोसले व काजल भोसले यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुध्द भा.दं.वि. चे कलम ३७६, ३४१, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात चिंगुबाई भोसले व काजल भोसले यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.
ॲड. निलेश जोशी, सोलापूर यांच्यामार्फत आरोपी चिंगुबाई व काजल यांनी उच्च न्यायालय, कोल्हापूर येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.
सदर अटकपूर्व जामिनाच्या अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती मेहरोज अशरफ खान पठाण यांच्यासमोर होऊन ॲड. निलेश जोशी यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी चिंगुबाई व काजल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपी चिंगुबाई भोसले व काजल भोसले यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी, सोलापूर यांनी उच्च न्यायालय, कोल्हापूर येथे काम पाहिले.



