सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावे
सोलापूर : उपरोक्त विषयास अनुसरून विनंती की , संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या मे महिन्यापासून सातत्याने खूप पाऊस पडत आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्या पावसात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांचं पीक चांगल्या अवस्थेत नाही
अशी अवस्था असून सुद्धा प्रशासनाने ठोस मदत देण्याऐवजी पंचनामे करण्याचा घाट घातला आहे
खऱ्या अर्थाने परिस्थिती अशी आहे की संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच्या सर्व गावातील सर्व मडलांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे शासनाकडे याची नोंद आहे पीक पेरा केलेला असल्याची नोंद आहे. आणी सर्व डाटा जर शासनाकडे आहे तर मग ” पंचनामा ” कशासाठी करायचा का पंचनामा करण्याचं नाटक करून शासन शेतकऱ्यांना येड्यात काडत आहे का हा खरा प्रश्न आहे, का शासनाकडे अतिवृष्टी व पिक पेरा केल्याची नोंद नाही असे तर शासनाने जाहीर करावे व मग पंचनामे करावे.
संपूर्ण तालुक्यातील सर्व मडलांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याची नोंद शासनाकडे आहे त्यामुळे शासनाने कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता ज्या शेतकऱ्यांनी शेतात पीक पेरलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट जास्तीत जास्त मदत द्यावी. अन्यथा शेतकरी बांधवांच्या हितास्तव शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी शासनाची राहील.



