सोलापूर

दळणवळणाच्या असुविधाचा कुंकू उद्योगाला फटका, रोपळे केम कंदर रस्त्या रस्त्याची दुरवस्था

दळणवळणाच्या असुविधाचा कुंकू उद्योगाला फटका
रोपळे केम कंदर रस्त्या रस्त्याची दुरवस्था
केम : रोपळे केम कंदर मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दूरावस्था झाली असून हा रस्ता त्वरीत करावा असी मागणी नागरिकांतून होत आहे
 हा रस्ता टेंभुर्णी अहिल्या नगर कुर्डूवाडी जोडणार असल्यामुळे या रस्त्यावर वाहनाची सारखी  वर्दळ असते मात्र ठीक ठिकाणी पडलेले खड्ड्यामुळे वाहन चालकांना जीव मोठे घेऊन वाहने चालवावी लागत असून अक्षरसा तारेवरची कसरत करावी लागत आहे कंदर केम हे सुमारे 14 किलोमीटर आंतर असलेले तरी खराब रस्त्यामुळे अंतर पार करण्यासाठी जवळपास पाऊण तास वेळ जातो
केम हे गाव कुंकू उद्योगासाठी देशात प्रसिद्ध असले तरी येथील दळणवळणाच्या सुविधामुळे याचा कुंकू उद्योगाला फटका बसला परिणामी आणि कुंकू कारखाने शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती गंभीर रुग्णांना अकलूज किंवा इंदापूर येथील रुग्णालय नेण्यासाठी या रस्त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे रस्त्याच्या खराबावस्तीमुळे वेळेत उपचार मिळवून शिकल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी रोपळे केम  कंदर रस्त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला मात्र यावर अजून कारवाई होणे प्रलंबित आहे
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान  कल्याणी ताई अजित तळेकर व पंचायत समिती केम गण बाळासाहेब बिचितकर यांच्या प्रचाराच्या सभेत युवा नेते अजित तळेकर यांनी हा रस्ता दोन महिन्यात मंजूर न केल्यास आमदार पाटील यांची साथ सोडण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आमदार नारायण पाटील यांनी  रोपळे केम कंदर या रस्त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले पंरूतु अद्याप ही यावर  कसलीही हालचाल दिसत नाही
त्यानुसार  आमदार पाटील यांनी  या रस्त्यासाठी प्रयत्न करावेत असी मागणी नागरिकांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button