सोलापूर

जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी परिचर कर्मचाऱ्यांमधून आरोग्य सेवक पदोन्नती देण्याबाबत निवेदन

 

जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी परिचर कर्मचाऱ्यांमधून आरोग्य सेवक पदोन्नती देण्याबाबत निवेदन.

सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर यांचेकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी परिचर संवर्गातून आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गात पदोन्नती होण्याबाबत आज निवेदन देण्यात आले.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 17 डिसेंबर 2025 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून सोलापूर जिल्हा परिषद मधील परिचर संवर्गातून पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पदोन्नती देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युनियनचे सचिव त्रिमूर्ती राऊत, कार्याध्यक्ष विशाल घोगरे, मुख्य सल्लागार श्रीशैल देशमुख, खलील जमादार, वसंत काळे, कृष्णा आधटराव, तुकाराम कांबळे, अंबादास कांबळे, रोहित शिंदे, बसवेश्वर डमडमे, जाधव, सरवदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button