आंदोलनाकरता राजकीय रिसोर्सेस करणारे कोण
शिव निर्णय /सोलापूर : मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एल्गार केला असून राज्यभरातील अनेक मराठी तरुण तरुणी या मोर्चाला संबोधित करीत आहेत लाखाच्या घरात मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईत दाखल झाले असून उपोषणाची शासनाने मुदत ही वाढवलेली आहे परंतु उपोषणाच्या परिसरात हॉटेल व्यवसाय छोटे मध्ये छोटे-मोठे बंद असल्या कारणाने मराठा समाजामध्ये शासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे निघालेले मराठा बांधवांचे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आहे. लाखो मराठा बांधव आणि हजारो गाड्यांच्या ताफ्यासह मनोज जरांगे हे राजधानीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, मला आश्चर्य वाटत आहे की, तुम्हाला हे आज दिसत आहे. यापूर्वी काय झाले हे सर्वांनी बघितले आहे. आजही आंदोलनाकरता राजकीय रिसोर्सेस करणारे कोण आहेत? आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्मातून पाहू, काही राजकीय पक्ष जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे नुकसान होईल, फायदा काही होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचा निशाणा कोणावर, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जरी त्यांचा रोष विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांकडे जरी असला तरी कोणीही सांगू शकेल देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसलेलेच या मोर्चाचे नियोजन करीत असतील असा काय सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे असावा.


