248 सोलापूर शहर उत्तर व 249- शहर मध्य विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधरण निवडणूक निरीक्षक म्हणून महमद सादिक आलम यांची नियुक्ती
सोलापूर दि.30:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 248 सोलापूर शहर उत्तर व 249- शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून महमद सदिकी आलम (भा.प्र.से.) यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत मा.सर्वसाधारण निरीक्षक महमद सादिक आलम (भा.प्र.से.) यांचे वास्तव्य घनिष्ट, सोलापूर शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 8180816248 हा आहे. नागरिकांना निवडणूक विषयक भेटायचे अथवा माहिती द्यावयाचे असल्यास सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत मा. निरीक्षक यांचे वास्तव असलेल्या सोलापूर शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे संपर्क साधता येईल. मा. निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर असणार आहेत. संपर्क अधिकारी यांचा भ्रमणध्वनी क्र. 9850327766 आहे.