सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रेला सुरुवात

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात दि 13 जानेवारी पासून सुरुवात होत आहे 68 लिंगाचे प्रदक्षिणा पूर्ण करून यात्रेला सुरुवात होत आहे दि. १४ जानेवारी २०२४ रोजी अक्षता सोहळयाच्या दिवशी नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर “संस्कारभारती” चे संपूर्ण भारत देशातील ४५० ते ५०० रंगावली कलाकार आपली कला सादर करत रांगोळीच्या पायघडया
(पथरंगावली) घालणार आहेत. उत्तर कसबा हिरेहब्बू मठापासून ते सिध्देश्वर मंदिरातील संमती कट्टा या तीन किलोमीटरच्या मार्गावर रंगावलीची सुरेख पायघडी अंथरण्यात येणार आहे.
मंगळवारी खास आकर्षक लेसर शोचे आयोजन
मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता होम
मैदानावर शोभेचे दारूकाम आतषबाजी सह खास लेसर शो होणार आहे या लेसर शो मधून श्री सिद्धरामेश्वरांचे जीवन चरित्र, समाज प्रबोधन संदेश तसेच यावर्षी पौराणिक कथा राहणार आहेत. लेसर शोसाठी बेंगलोर येथील नामांकित कंपनीला निमंत्रित करण्यात आले असल्याचे यावेळी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.
प्रथमच सायक्लोन, मेरीगो राऊंड, सुनामी, टॉवर विशेष आकर्षण यात्रा काळात विविध स्टॉल्स दुकाने व करमणुकीची साधने उपलब्ध राहणार आहेत तसेच करमणुकीसाठी रेंजर पाळणा, टॉवर पाळणा, आकाश पाळणे, ऑक्टोबस ट्विस्टर, मारुती मौत का कुवा, ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, क्रॉस व्हील , सेलंबो , मिनी ड्रॅगन रेल, नावाडी, टोराटोरा तसेच प्रथमच सायक्लोन, मेरीगो राऊंड, सुनामी, टॉवर , रेम्बो इत्यादीचे आकर्षण राहणार आहे.
- तीन वर्षानंतर प्रथमच जनावर बाजार भरणार
यात्रा काळात तीन वर्षानंतर प्रथमच यंदा जनावरांचा बाजार भरत आहे. 31 जानेवारी 2024 दरम्यान दर मंगळवारी हा बाजार भरणार आहे त्यासाठी कोणताही अडथळा अथवा अडचण नाही असेही यावेळी अध्यक्ष काडादी यांनी स्पष्ट केले.