शिव निर्णय / सोलापूर : नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत भारतीय संविधान दिन व शाहिद दिन उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते .प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले उपस्थित होते.प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहिद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,राजकुमार मरगुरे,उमदेवी कुंभार व ज्ञानेश्वर म्हेत्रे उपस्थित होते. प्रतिमा पूजनानंतर संविधानाची शपथ घेण्यात आली.
भावना येमूल, अक्षता कंनकट्टी, स्वप्निल स्वामी, सृष्टी माळी, स्नेहा स्वामी व भाग्यश्री नागेल्ली विद्यार्थ्यांनी भाषण केले.माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,राजकुमार मरगुरे, ज्ञानेश्वर म्हेत्रे व उमादेवी कुंभार यांनी मनोगतातून संविधानचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षिय भाषणात प्राचार्य रविशंकर कुंभार म्हणाले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिल्यामुळेच जगभरात भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. कायद्यांवरच देशाची वाटचाल चालू आहे. तसेच २६/११ च्या घटनेत भारतीय शूर वीर अधिका-यांनी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी शहिद झाले. त्यांचे सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे सांगून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर इरणा कलशेट्टी यांनी आभार मानले.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी