सोलापूर

आषाढी वारी : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

नोडल अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा हद्दीत पालख्यांचे स्वागत होणार

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर
नोडल अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा हद्दीत पालख्यांचे स्वागत होणार
सोलापूर, दि. 8 (जिमाका ) : आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या महाराष्ट्रातील १० प्रमुख मानाच्या पालख्यांचे प्रस्थान व सोलापूर जिल्हा हद्दीतील आगमनाचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. सर्व पालख्या १६ ते २० जुलै २०२६ या पाच दिवसांत जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पालख्यांचे सोलापूर जिल्हा हद्दीत स्वागत करण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
अनुक्रमांक १ ची श्री संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी पालखी दि. ०८ जुलै २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १९ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक २ ची श्री संत तुकाराम महाराज, देहू पालखी दि. ०७ जुलै २०२६ रोजी निघणार असून दि. २० जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात येईल. अनुक्रमांक ३ ची श्री संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर पालखी दि. २४ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १९ जुलै २०२६ रोजी जिल्हा हद्दीत पोहोचेल.
अनुक्रमांक ४ ची श्री संत सोपान महाराज, सासवड पालखी दि. १२ जुलै २०२६ रोजी निघून दि. २० जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यात येईल. अनुक्रमांक ५ ची श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर पालखी दि. २९ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १८ जुलै २०२६ रोजी जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक ६ ची श्री संत एकनाथ महाराज, पंढरपूर पालखी दि. ०७ जुलै २०२६ रोजी निघणार असून दि. १९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात येईल.

अनुक्रमांक ७ ची श्री संत गजानन महाराज, शेगाव पालखी दि. २१ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १७ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक ८ ची श्री विठ्ठल रुक्माई संस्थान, कौंडण्यपूर पालखी दि. १९ जून २०२६ रोजी निघून सर्वात प्रथम दि. १६ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात येणार आहे. अनुक्रमांक ९ ची श्री संत चांगावटेश्वर देवस्थान, सासवड पालखी दि. १२ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. २० जुलै २०२६ रोजी जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक १० ची श्री संत निळोबाराय महाराज, पिंपळनेर पालखी दि. १० जुलै २०२६ रोजी निघून दि. १९ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यात येईल.
१९ जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, एकनाथ महाराज व निळोबाराय महाराज अशा ४ पालख्या, तर २० जुलै रोजी तुकाराम महाराज, सोपान महाराज व चांगावटेश्वर देवस्थान अशा ३ पालख्या एकाच दिवशी जिल्ह्यात दाखल होणार आहे.
लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक पालखीसाठी नोडल व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. वारकरी व नागरिकांनी प्रवासात अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र. ०२१७-२७३१०१० येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
***

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन ; नोडल व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची यादी जाहीर
सोलापूर, दि. 8 (जिमाका ) : आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. वारकऱ्यांना पालखी मार्गावर पाणी, आरोग्य, वाहतूक, स्वच्छता, निवारा व सुरक्षा सुविधा अखंड मिळाव्यात, यासाठी प्रत्येक पालखीसाठी ‘सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
मानाच्या पालख्या त्यांचे नोडल अधिकारी व सहाय्यक अधिकारी यांचे नावे पुढीलप्रमाणे…
१. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, आळंदी – नोडल अधिकारी : श्री. बी. आर. माळी, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा – ९८६०९५१६४२ – सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर – ८३८०४५०७७
2. श्री. रघुनाथ पांढरे, गटविकास अधिकारी, माळशिरस – ८२०८६६००६५
3. श्री. अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर – ८९८३१६०६०१
4. श्री. झाळटे, सहा. पोलीस निरीक्षक, बार्शी शहर – ९३२६८६५७९९
२. श्री संत तुकाराम महाराज पालखी, देहू
– नोडल अधिकारी : श्री. सुमित शिंदे, उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. २ – ८२७५२६५४७१
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. सोलापूर
2. श्री. रघुनाथ पांढरे, गटविकास अधिकारी, माळशिरस – ८२०८६६००६५
3. श्री. अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर – ८९८३१६०६०१
4. श्री. सचिन माळी, पोसई – ८८८८८५५२७७
३. श्री संत मुक्ताबाई पालखी, मुक्ताईनगर
– नोडल अधिकारी : श्री. राहुल क्षीरसागर, जिल्हा जलसंधारण अधिकारी – ९८१०५५५५०८ / ७०२०२४९९२४
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. प्रसाद काटकर, कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु.जि.प. – ९६०४५५४६५५
2. श्री. सागर वारबकर, जिल्हा कृषि अधिकारी – ९४०४३१७८००
3. श्री. कर्णेवाड, पोलीस उपनिरीक्षक मोहोळ – ९८९०५४५८८८
४. श्री संत सोपान महाराज पालखी, सासवड
– नोडल अधिकारी : श्री. लक्ष्मण आघरे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण – ९५४५५३३८५५
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. हरिदास हावळे, जिल्हा कृषि अधिकारी – ९४२२९३८९२३
2. डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, करमाळा – ९५५६२३०२९०
3. श्री. मोरे, पोलीस उपनिरीक्षक, अ.नै.शा.वाह.कक्ष – ७५८८०४८६०१
५. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वर
– नोडल अधिकारी : श्री. आशिष लोकरे, सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन – ९६०४२५००००
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. मनोज राऊत, गटविकास अधिकारी, दक्षिण सोलापूर – ९०२१४३३१८५
2. डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, करमाळा – ९५५६२३०२९०
3. श्री. ढोरे, पोसई, करमाळा पोलीस ठाणे – ९०११९६१९६१

६. श्री संत एकनाथ महाराज पालखी, पैठण
– नोडल अधिकारी : श्रीमती भाग्यश्री जाधव – ९४२२१००३८६
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. अब्दुल गफुर, कार्यकारी अभियंता, बांधकाम क्र. १ – ९७६२६३७०११
2. श्री. महेश सुले, गटविकास अधिकारी, कुर्डुवाडी
3. श्री. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, कुर्डुवाडी – ९९२३१३५७५५ / ९४०३६८४३१५
७. श्री संत नामदेव महाराज पालखी, पंढरपूर
– नोडल अधिकारी : श्री. शुक्राचार्य मोसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी – ९४०३६८४३१५
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर – ८९८३१६०६०१
2. श्री. फुगारे, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे – ९९२३०८१९८८
८. श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान, कौंडणपूर
– नोडल अधिकारी : श्री. एम. पी. मगर, अधीक्षक भूमी अभिलेख – ९८२२४२३११७
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. – ९३५६२०२५१०
2. श्री. विवेक जमदाडे, गटविकास अधिकारी, पं.स. बार्शी – ९४०४६७६९६७
3. श्री. शेख, पोसई, पोलीस ठाणे कामती – ७८४०१९४५०७

९. श्री संत निळोबाराय महाराज पालखी, पिंपळनेर
– नोडल अधिकारी : श्री. शिवाजी दहाके, जिल्हा सह निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी – ८०७७१७४३३९
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. – ९४२१०३०४८०
2. श्री. शंकर कवितके, गटविकास अधिकारी, पं.स. अक्कलकोट – ९७६६०२१२०१
3. श्री. संदीप वनकर, करमाळा पोलीस ठाणे – ९०११९८८८८१
१०. श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड
– नोडल अधिकारी : डॉ. विशाल येवले, उपायुक्त पशुसंवर्धन – ८४५९४४७६९१
– सहाय्यक समन्वय अधिकारी :
1. डॉ. अनिल तांबे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन – ९५११९६६५०७७
2. श्री. अरुण वाघमोडे, गटविकास अधिकारी (नरेगा), जि.प.
3. श्री. मदने, पोलीस उपनिरीक्षक, टेंभूर्णी पोलीस ठाणे – ७१७१७२५८८५१
अधिकाऱ्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या : पालखी मार्ग, मुक्काम स्थळे, रस्ते, नदीघाट, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, वाहतूक वळण, पार्किंग, कायदा व सुव्यवस्था यावर २४x७ लक्ष ठेवणे. दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास अहवाल सादर करणे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने Incident Commander यांच्याशी समन्वय साधणे.
वारकऱ्यांसाठी सूचना : प्रवासादरम्यान कोणतीही अडचण, वैद्यकीय आणीबाणी किंवा गैरसोय झाल्यास वरील संबंधित नोडल अथवा सहाय्यक अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष : ०२१७-२७३१०१० येथे २४ तास संपर्क करता येईल.
“लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत. प्रत्येक पालखी मार्गावर नियुक्त अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून सेवा देतील,” अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.
***

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे
– जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
*जिल्हा प्रशासनाकडून पालखी प्रमुखाशी समन्वय असावा व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक पालखीसाठी एक नोडल अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
*श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्या पुणे येथे आल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था व स्वच्छता अनुषंगाने 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती, पुणे येथूनच ते सोबत राहणार
*सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेशावेळी प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करणे बंधनकारक
सोलापूर, दिनांक 8:- आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी आहे. या अनुषंगाने मानाच्या पालख्या 16 जुलै पासून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यावेळी त्यांच्या मुक्काम, रिंगण, विसाव्याच्या ठिकाणी तसेच रस्ते मार्गावर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची व त्यांना सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखाशी समन्वय ठेवून सोपवलेली जबाबदारी एक “टीम वर्क” म्हणून पार पाडून वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.
मानाच्या पालख्यांसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी सहाय्यक अधिकारी तसेच शौचालयाची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अमोलसिंह भोसले, सुमित शिंदे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सैफन शेख, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयात तर सर्व नियुक्त केलेले अधिकारी ऑनलाईन द्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. आज पासूनच नियुक्त केलेल्या पालखी प्रमुखाशी बोलून घ्यावे. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर पालखी समवेत राहून पालखीच्या मुक्काम, विसावा रिंगण या ठिकाणाला भेटी द्याव्यात. तसेच रस्ते मार्गाची पाहणी करावी. पाहणी दरम्यान अडचणी असतील त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना संबंधित नोडल अधिकारी यांनी पालखीचे यथोचित स्वागत करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी समवेतच राहणे बंधनकारक आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या व सकाळच्या वेळेला विज पाणी व शौचालयाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत अगोदरच माहिती घेऊन त्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणेच मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शौचालयाची व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी स्वतंत्र दोन टीम च्या माध्यमातून 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पुणे येथून राहून मुक्कामाच्या ठिकाणी पुरवठादारने दिलेल्या शौचालयाची पाहणी करावी ते व्यवस्थित आहेत का याची खात्री करावी तसेच एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी ते योग्य वेळेत पोहोचले पाहिजेत या दृष्टीने त्यांच्याशी संवाद ठेवून कार्य करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले. तसेच या टीमने दिवसातून सकाळ दुपार व रात्री असे तीन वेळा कॉल करून प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सर्व मानाच्या पालखी प्रमुखांशी तसेच पुणे येथून पालख्या सोबत शौचालयाची व्यवस्था पाहणी व पुरवठादार यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याची माहिती सविस्तरपणे सांगितली. व दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निर्देशित केले.
****

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button