सोलापूर

कुर्डूवाडी येथे कांदा खरेदी केंद्रासाठी नाफेड कडे मागणी करणार –  संजय शिंदे

 

कुर्डूवाडी येथे कांदा खरेदी केंद्रासाठी नाफेड कडे मागणी करणार –  संजय शिंदे
बेंबळे :  केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी केंद्राचा विस्तार होत आहे शेतकऱ्याला सुविधा देण्यासाठी राज्यात नाफेड नवीन कांदा केंद्रांना मंजुरी देत असून माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे कांदा खरेदी केंद्र व्हावे अशी  नाफेड कडे मागणी करणार असल्याची माहिती कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी दिलीआहे.
     वृत्तांत असा की उजनी धरणामुळे माढा तालुक्याचा 80 टक्के भाग ओलीताखाली आलेला आहे त्यामुळे ऊस केळी डाळिंब फळबागा अशी नगदी पैशाची पिके शेतकरी पिकवत असला तरी  माढा तालुक्यामध्ये कांद्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे ही वस्तुस्थिती आहे. माढा तालुक्यातील ढवळस, चौबे पिंपरी, लऊळ, कुर्डू, पडसाळी, भूताष्टे, अरण ,भेंड व मोडनिंब परिसरातील  कांही गावांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.
…. विशेष म्हणजे सध्या माढा तालुक्यातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्वात जास्त कांदा विक्रीसाठी जातो व राज्यात कांदा खरेदी- विक्रीसाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नंतर दोन नंबरची मार्केट कमिटी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ,त्यामध्ये माढा तालुक्यातील कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर माल पाठवतात. या वस्तुस्थितीचा विचार करून शेतकऱ्याला हमीभाव सेवा, अत्यावश्यक सुविधा, वाहतुकीमध्ये सुलभता, तसेच निवड न करता कांद्याची खरेदी विक्री व व्यवस्थित भाव याचा विचार केला तर नाफेडचे कांदा खरेदी केंद्र कुर्डूवाडी येथे होणे  अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे  माजी आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की  कुर्डूवाडी येथे कांदा केंद्र होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्याची तयारी सुरु आहे व लवकरच या कांदा खरेदी केंद्राला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व विश्वास आहे.
…… ढवळस चोबे पिंपरी लऊळ कुर्डू व मोडनिंब  परिसरात प्रत्येक वर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन होत आहे, कुर्डूवाडी येथे बाजार समितीची मोठी गोडाउन्स  आहेत , वाहतूक व आसपासच्या कांदा उत्पादक बेल्टचा विचार करता नाफेड ने कुर्डूवाडी येथे कांदा खरेदीस मंजुरी द्यावी अशी हजारो कांदा उत्पादकाची अपेक्षा आहे, या केंद्रासाठी आदरणीय संजय मामा शिंदे करत असलेल्या प्रयत्नास माढा व करमाळा तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादकांचा मनस्वी पाठिंबा आहे.
      संतोष अनभुले
        उपसरपंच ,
ढवळस तालुका माढा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button