महापालिकेच्या विभागीय कार्यालयाने आणि नगर अभियंता कार्यालयाचे विजापूर रोडवरील पावसाळी नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष

महापालिकेच्या विभागीय
कार्यालयाने आणि नगर अभियंता कार्यालयाचे विजापूर रोडवरील पावसाळी नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष
सोलापूर : महापालिकेच्या विभागीय
कार्यालयाने आणि नगर अभियंता कार्यालयाने विजापूर रोडवरील पावसाळी नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केले आहे. या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने विविध ठिकाणी नालेसफाईचे काम सुरू केले आहे, परंतु विजापूर रोडवरील नाल्यांकडे दुर्लक्ष आहे. मागील वर्षी जुळे सोलापूर, विजापूर रोड भागातील अनेक घरांमध्ये पाणी साचले होते. जय जलारामनगर, द्वारकाधीशनगर, मंत्री चंडकनगर, राणा प्रतापनगर या भागांतील रस्त्यावर पाणी साचून रस्ते बंद झाले होते. या भागातील नैसर्गिक नाले बुजविण्यात आल्यामुळे आणि पावसाळी गटारांची व्यवस्थित स्वच्छता झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. त्यानंतर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या परिसराची पाहणी केली. नगर अभियंत्यांना नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करायला लावले. या सर्वेक्षणानुसार नाल्यांचे नकाशे पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले. पावसाळी गटारी स्वच्छ करणे आणि नैसर्गिक नाले खुले करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते, परंतु नाले खुले झालेले नाही. त्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्यांची स्वच्छता झाली नाही.
विशालनगरमध्ये स्वामी समर्थ डेव्हलपर्स यांनी बहुमजली इमारत उभारली आहे. याचा रॅम्प नैसर्गिक नाल्याला अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा रॅम्प हटविण्याची नोटीस मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी बजावली होती.
विजयपूर रोड परिसरातील विविध रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये पावसाळ्यापूर्वीच कचरा अडकल्याने आगामी काळात या नाल्यांमध्ये कचरा अडकून यातील सांडपाण्याचा निचरा होणार नाही. तसे झाल्यास ते पाणी नाल्याच्या बाहेर पडेल. या परिसरात असलेल्या सखल भागातील घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाच्यावतीने या नाल्यांमध्ये अडकलेला कचरा काढण्याची गरज आहे. कचरा न काढल्यास ऐन पावसाळ्यात नागरिकांसह महापालिका प्रशासनाचीही धावपळ होईल. ते होऊ नये यासाठी महापालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाने दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देऊन कचरा काढण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या धर्तीवर
पालिकेने विजयपूर रोड परिसरातील विविध लोक वसाहतीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाला सफाईची कामे करणे आवश्यक आहे. या परिसरातील नाल्यांकडे नगर अभियंता कार्यालयाकडून दुर्लक्ष होत आहे. गेल्या पावसाळ्यात जुळे सोलापूर, विजापूर रोड आणि होटगी परिसरातील सखल भागात असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
सध्या पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याची नितांत गरज आहे. आजही नाले खुली झालेली नाहीत. त्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्यांची स्वच्छताही केली नाही. पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचलेला कचरा नैसर्गिक नाल्याला अडथळा ठरत असल्याने या नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ आणि फळ विक्रेते हे त्यांच्याकडे दिवसभर जमा झालेला कचरा रात्री या नाल्यांमध्ये टाकून मोकळे होतात. मंत्री चंडक ते सैफुल या दरम्यानच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. फळांचे वापरलेले बॉक्सही येथेच टाकतात. या बेजबाबदार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. द्वारकाधीश मंदीर, मंत्री चंडक, राणा प्रताप आणि जय जलाराम आदी नगरातील सखल भागात असलेल्या अनेक घरात गतवर्षी पाणी गेले होते. तसेच, साचलेल्या पाण्यामुळे काही रस्तेही बंद झाले होते. ते होऊ नये यासाठी प्रशासनस्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे.
मंत्री चंडक ते सैफुल या दरम्यानच्या पावसाळी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा विजापूर रोडवरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते त्यांच्याकडे जमा कचरा रात्रीतून पावसाळी नाल्यांमध्ये टाकत आहेत. मंत्री चंडक ते सैफुल या दरम्यानच्या पावसाळी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, फळांचे मोडलेले बॉक्स असा कचरा साचला आहे. मागील वर्षी सैफुलजवळ एका बांधकाम व्यावसायिकाने पावसाळी नाल्यात दगड टाकून रस्ता तयार केला होता. या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

