बेल्हे येथे लोक कलावंतांच्या मागण्यांकरिता व न्याय हक्कांसाठी 21 मे जुन्नर तहसील कार्यालयावर भव्यदिव्य मोर्चा

*आज बेल्हे येथे लोक कलावंतांच्या मागण्यांकरिता व न्याय हक्कांसाठी 21 मे जुन्नर तहसील कार्यालयावर भव्यदिव्य मोर्चा चे नियोजना संदर्भात लोककलावंतांची बैठक संपन्न*
आज रोजी बेल्हे तालुका जुन्नर येथे लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या 21 तारखेच्या तहसील कार्यालयावर लोककलावंतांच्या भव्य मोर्चाचे नियोजन संदर्भाची मीटिंग संपन्न झाली, या बैठकीमध्ये अनेक लोक कलावंतांचे अडीअडचणी व शासनाने लोक कलावंतांकडे केलेले दुर्लक्ष व मानधनापासून कलावंत वंचित राहिल्याने तसेच शासनाच्या लोककलावंतांच्या अनेक योजना नुसत्या कागदावर असल्याने, ग्रामीण कलावंत नाराज, याच अनुषंगाने 2024 25 चे जे प्रस्ताव शासनाने मंजूर केल्या असून इतर जिल्ह्यांमध्ये त्यांचे मानधन मिळायला सुरुवात झाली परंतु पुणे जिल्ह्यात मात्र मानधनापासून आजही कलावंत वंचित आहेत व त्यांना कुठलाच कलाक्षेत्राचा लाभ मिळालेला नाही सदरच्या योजना नुसत्याच कागदावर दिसून येत आहे त्यावर कोणीही अंमलबजावणी करताना दिसत नाही त्यामुळे आज लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंचावतीने कलावंत जागृत झालेला आहे दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी अकरा वाजता जुन्नर तहसील कार्यालयावरती अडीच हजार लोक कलावंतांचा मोर्चा धडकणार आहे असे संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष गवनेरजी सरोदे साहेब, यांनी एका प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात म्हटले आहे त्यांनी अनेक लोककलावंतांच्या व्यथा मांडल्या अनेक कलावंतावरती अन्याय झाल्याचे सांगितले त्यानंतर सुनील बर्वे यांनीही व्यथा मांडल्या त्यानंतर संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा चे मालक संजय महाडिक यांनीही कलावंतांच्या समस्या मांडताना असे म्हटले आहे की फक्त याचा वशिला असेल त्यांनाच मानधन असेल किंवा कला क्षेत्रात काही अनुदान असेल ते त्यांना दिले जाते सर्वसाधारण मात्र डावलले जाते, याच अनुषंगाने या सर्व गोष्टीचा विचार करून लोककला सांस्कृतिक विचार मंचावतीने एक अडीच हजार लोककलावंतांचं गजर आंदोलन जुन्नर तहसीलदार कार्यालयावरती धडकणार आहे ह्या आंदोलनामध्ये 101 ताशा सम्राट 101 संबळ सम्राट 101 सनई सम्राट आदिवासी नृत्य लेझीम 101 पोतराज व विविध लोक कलावंत समाविष्ट होणार आहेत, हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज ह्या चौकातून थेट तहसील कार्यालयाकडे जाणार आहे व तिथे सुमारे दोन तास गजर आंदोलन करणार आहे यामध्ये ग्रामीण कलावंत तिथे आपली कला सादर करणार आहे अशा पद्धतीने या मोर्चाचं स्वरूप आहे तरी आजच्या मीटिंगमध्ये या सर्व मोर्चाच्या नियोजना संदर्भात सखोल विचार विनिमय व चर्चा करण्यात आली. ह्या मीटिंग करता,,, लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे साहेब, बाबूलाल शेख पुणे जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब शिरतार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, सुनील बर्वे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष, संजय महाडिक कार्याध्यक्ष, बन्सी दादा त्रिभुवन संघटक प्रमुख अहिल्यानगर, किशोर अडांगळे अहिल्यानगर सचिव, नारायण पथवे, अहिल्यानगर संपर्कप्रमुख, स्वप्निल गायकवाड, जुन्नर तालुका अध्यक्ष युसुफ मोमीन, जुन्नर तालुका उपाध्यक्ष गौतम देठे, गुलाब रोकडे, रघुनाथ जाधव, पत्रकार संदीप शितोळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते



