महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथे कडकडीत बंद

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटना : संपाचा तिसरा दिवास

विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय कर्मचारी यांचा बेमुदत संप
पंढरपूर,  : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटनेने दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपात सोलापूर जिल्ह्यासह पंढपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथे गेल्या तीन दिवसांपासून कडकडीत बेमुदत संप करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व कामगार नेते श्री अशोक इंदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 21 एप्रिल पासून बुधवार व गुरुवारी गेल्या तीन दिवसांपासून कडकडीत बेमुदत आंदोलन सुरु आहे.
यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागु करणे, सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 करणे, शासनाने रिक्त पदे तात्काळ भरावीत इत्यादी 16 प्रमुख माण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संपामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रथम लिपिक एस.एम.काळे, प्रविण तुपसौंदर, प्रदिप सावंत, ‍शिवानंद दनुरे, सचिन बागल, किशोर दिघोळे, के.ऐ.गोरे, अतुल जाधव, वैभव पंडीत, सुदर्शन कांबळे, नानाभाऊ वाळके, योगेश जाधव, अमोल पवार, गणेश मोरे, विक्रांत पाटील, श्रीमती एस.बी.वाघमोडे, उत्कर्ष देशमुख, सचिन देठे, ए.ए.हजारे, नानागौडा बिरादार, अजय पाटील, आनंदा लोखंडे, योगेश हवलदार, एस.व्ही.लवटे, बाबा लवटे, अवधुत वाघमारे, एस.व्ही. हाके,एम.एम.यादव, श्रीमती एस.एस.शिंदे, श्रीमती जे.एस.शेख, एस.जी.बारसकर, एस.एम.साळुंखे, एस.ए.शेख आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता अमित निमकर, उपकार्यकारी अभियंता एस.डी.शिंदे, उपविभागीय अभियंता बि.एम. मिटकरे, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी आर.आर.घोप यांनी आंदोलक कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या शासन स्तरावर पोहोच करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button