सोलापूर
वसुलीला आलेल्या महिलेकडे टेंभुर्णी येथील डॉक्टरने केले अश्लील चाळे, डॉक्टरवर गुन्हा दाखल
वसुलीला आलेल्या महिलेकडे टेंभुर्णी येथील डॉक्टरने केले अश्लील चाळे, डॉक्टरवर गुन्हा दाखल.
टेंभुर्णी : कर्ज वसुलीसाठी आलेल्या २५ वर्षीय महिलेवर अश्लील मागणी केल्याप्रकरणी एका डॉक्टरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास टेंभूर्णी शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बँकेच्या कर्ज वसुलीसाठी डॉक्टर यांच्याकडे आली होती. यावेळी डॉक्टरांनी महिलेला “तू लांबून आली आहेस, आपण दोघे जेवूया व वरच्या खोलीत विश्रांती घेऊया” असे सांगत शरीर सुखाची मागणी करून मनास लज्जा वाटेल असे हावभाव केल्याची तक्रार सदर पिडीत महिलेने तक्रारीवरून टेंभूर्णी पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक केशव झोळ करत आहेत.
याबाबत टेंभुर्णी शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून या अगोदरही टेंभुर्णी बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या लॉजवर एका महिलेवर मॅनेजर वारंवार पसंत करून पीडित महिलेचे फोटो इंस्टाग्राम वर टाकले होते परंतु सदर घटनेबाबत डॉक्टर बाबत शहरातील अनेकांची सहानभूती असून संबंधित कर्ज वसुलीचा तर हा प्रकार नाही ना याबाबत शहरात चर्चेला उधाण आले असून खरे काय ते पोलीस थोड्या दिवसात समोर आणतील



