विनायक दीक्षित.
कुर्डूवाडी, : कुर्डूवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची “मातोश्री ” वर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नूतन नगरसेवक,नगरसेविका व माढा तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कुर्डूवाडी नगरपालिकेत परत एकदा ठाकरे सेनेची सत्ता आणल्याबद्दल जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष जयश्री भिसे व शहर प्रमुख कुमार गव्हाणे यांचे कौतुक करून निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन ठाकरे यांनी केले.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माढा तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबतचा आढावा तालुकाप्रमुख मधुकर देशमुख व उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ गायकवाड यांच्याकडून घेतला. तसेच त्यांना नुकसान भरपाई मिळाली का याबाबतही विचारणा केली, याशिवाय विधानसभेला अजून तीन वर्ष आहेत तोपर्यंत जोमाने काम करा आपल्याकडे मतदारांना त्यांचे काम करणे एवढा एकच पर्याय शिल्लक असल्याचे बोलून दाखवून यापुढील काळात नेत्यांच्या जीवावर नाही तर कामाच्या जोरावरच आपण निवडणूक जिंकू शकतो असा सल्ला दिला.
नगरपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष व पाच नगरसेवक निवडून आले त्यानंतर ज्या ज्या वेळेस निवडणुका होतात आणि शिवसेनेचे निवडून आलेले शिलेदार हे मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतात अशी प्रथा आहे यावेळी मात्र नगरपरिषद निवडणुका नंतर महापालिका निवडणुका त्यानंतर तालुका पंचायत व पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळत नव्हती काल रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ची वेळ मिळाल्याने नगराध्यक्ष जयश्री भिसे सर्व नगरसेवक तसेच अपक्ष नगरसेवक शकील तांबोळी व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतले. यावेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जयघोष शिवसैनिकांनी केला.
यावेळी नगर परिषदेतील गटनेते ऋषीपाल वाल्मिकी नगरसेविका अंजली गावडे,अबोली चौधरी, सरस्वती क्षीरसागर, रेश्मा गोरे, नगरसेवक शकील तांबोळी,उपतालुका प्रमुख माणिक श्रीरामे, युवा सेना प्रमुख सचिन बागल, महिला आघाडीच्या साक्षी भिसे, आशा टोणपे, वैशाली भाटे,साक्षी डिकोळे,मानसी मेहता, भीमराव कोळी, रमण शेंडगे, सोमनाथ गवळी, शिवाजी चौधरी,जावेद सय्यद, यासीन शेख, अभिषेक डिकोळे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





More Stories
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती : आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार
महात्मा फुले जयंतीदिनी समता सैनिक दलाची मानवंदना
राज्य सीईटी आता वर्षातून दोन वेळा; पीसीएम, पीसीबी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठी मोठा निर्णय