शिवसेना आढावा बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्याचा निर्धार
मराठी सारांश
रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या आढावा बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस आमदार व शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
English Summary
During a review meeting held on the occasion of Shiv Sena’s foundation day, the Raigad district leadership resolved to hoist the saffron flag in the upcoming local body elections. The meeting, held under the guidance of Minister Bharat Gogawale, saw participation from key MLAs and party functionaries.
सविस्तर माहिती
शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्ताने रायगड जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पोसरी येथील पॅरामाऊंट बँक्वेट हॉल मध्ये पार पडली. बैठकीचे मार्गदर्शन मंत्री भरत गोगावले यांनी केले.
या बैठकीस आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, विजय पाटील, सुनील पाटील, संभाजी जगताप, सुदाम पवळी, संदेश पाटील आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या.
मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा असेल, तर आतापासूनच संघटनबांधणीला सुरुवात करावी.“
यावेळी शिवराम बदे, दिलीप ताम्हाणे, संकेत भासे, रमेश मते, अंकुश दाभणे, गजेंद्र वाघेश्वर, सुनील रसाळ यांच्यासह महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.