सोलापूर

सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी विजय कुलकर्णी 

  • सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी विजय कुलकर्णी
     सोलापूर : सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या (फेस्कॉन) अध्यक्षपदी महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता व सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.व्ही.एन तथा विजय  कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पार पडली.त्या सभेत आगामी तीन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघाच्या उपाध्यक्षपदी श्रीनिवास करकमकर, कार्याध्यक्षपदी रमेश सोनी, सचिवपदी नागनाथ पाटील, सहसचिवपदी सतीश पाटील, कोषाध्यक्षपदी अशोक गरड तर संघटकपदी श्रीमती निशा गोडबोले यांची निवड करण्यात आली. तसेच संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्वश्री विजयकुमार अथतीकर, पन्नालाल चंडक, अरविंद जगताप, डॉ.राजीव मोहोळकर, विश्वास मोहिते, पांडुरंग अदोने, घनशाम दायमा, ॲड.राजेंद्र दीक्षित व गुरुलिंग कन्नुरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सल्लागार मंडळात सर्वश्री महादेव माने, श्रीमती कमलाताई शर्मा, विजयकुमार खंडेलवाल, बळवंत अहंकारी, पत्रकार दशरथ वडतिले व सुनील तथा दत्ता आराध्ये यांना संधी देण्यात आली आहे. या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button