महाराष्ट्रसामाजिक उपक्रम

सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत विश्व अकॅडमीच्या युवक युवतीनयी केले जनप्रबोधन

अलिबाग : सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून  स्पर्धा विश्व अकॅडमीच्या युवक युवतीने नियम पाळा वाहन सावकाश चालवा याविषयी केले जनप्रबोधन……
नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, जिल्हा वाहतूक विभाग, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्धा सामजिक विकास संस्था रोहा, स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र रायगड जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला व जिल्हा वाहतूक शाखा, रायगड- अलिबाग पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद जयंती व सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत अलिबाग बस स्थानकासमोर नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी म्हणजेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादे पेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहन चालवताना लेन कटिंग करू नये, पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन चालवू नये, वाहन चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्या अशा नियमांविषयी जनप्रबोधन करण्यात आले. तसेच उपस्थित युवक युवतीने ट्राफिक पोलिसांच्या सहाय्याने ट्राफिक कंट्रोलिंग साठी सहकार्य केले. यावेळी या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले. तसेच यावेळी जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबागचे पोलीस हवालदार प्रदीप झेमसे, पोलीस हवालदार किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काळोखे, पोलीस हवालदार परम ठाकूर पोलीस अमलदार रुपेश शिर्के इ चलन समन्वयक मंगेश कावजी, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, नेहरू युवा केंद्राचे कर्मचारी जयेश म्हात्रे, बार्टी समतादूत अनुजा पाटील व स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक युवती उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button