राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यकारी समिती व पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
*सन २०२६-२७ NHM PIP अंमलबजावणीसाठी नियोजनाला गती देण्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांचे निर्देश*
सोलापूर, दि. २४ सप्टेंबर २०२६ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाची कार्यकारी समिती व पी.आय.पी आढावा बैठक आज जिल्हा परिषद येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये सन २०२६-२७ च्या पी.आय.पी मध्ये मंजूरी मिळालेल्या विविध आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेऊन त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन व कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये पुढील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या—
1. एन.एच.एम पी.आय.पी.चा आढावा घेऊन मंजूर बाबींच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
2. पंधरावा वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला.
3. तालुकास्तरावरील प्रयोगशाळा बांधकामे व त्यातील आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
4. मंजूर केलेला निधी, मार्च – 2027 अखेर संपूर्णपणे खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या
5. सेवा संकल्पत अभियान अंतर्गत DBT विषयक लाभ देणेकामी, लाभार्थी, आशा स्वंयसेविका, आरोग्य सेविका यांचे अधार सिंडीग विषयक शिबीर आयोजित करुन, प्रलंबित देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
6. साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगार यांच्याकरीता आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
7. बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाबाबत संबंधित नियुक्त कंपनीसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
8. प्रलंबित व थकीत देयके सादर करण्यासोबतच, खराब झालेल्या कोल्ड चेन उपकरणांची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आली.



