बिग बॉस मराठीची विजेती तन्वी कोलते यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
महेश इंगळे यांच्या हस्ते तन्वी कोलते यांचा सत्कार

बिग बॉस मराठी सीझन ६ ची विजेती तन्वी कोलते यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.
चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते
तन्वी कोलते यांचा सत्कार.
अक्कलकोट : बॉस मराठी सीझन ६ ची विजेती अभिनेत्री कुमारी तन्वी कोलते यांनी आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थाला भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन तन्वी कोलते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी उपस्थित होते.
यावेळी तन्वी कोलते म्हणाल्या की
बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यात जास्त आठवण यायची ती स्वामींची. आज विजयी झाल्यानंतर पहिल्यांदा इथे येऊन त्यांचे आभार मानते. इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वामी आपलेसे वाटतात. अक्कलकोट मंदिरात जी शांतता, स्वच्छता आणि भक्तांसाठी असलेली आत्मीयता आहे, ती खरंच वाखाणण्या जोगी आहे. चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या नेतृत्वात देवस्थानचं खूप सुंदर काम सुरू आहे. स्वामींच्या आशीर्वादानेच मला हे यश मिळालं आहे असे सांगून सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी तन्वी कोलते यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.



