सामाजिक उपक्रम
अकलूज रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद : युनूस तांबोळी

अकलूज : रोटरी क्लब ही गरजू लोकांसाठी वाहून घेतलेली संघटना असून,कोविड काळात रोटरी क्लबचे कार्य अतिशय कौतुकास्पद होते, समाजातील उपेक्षित प्रश्न हाती घेऊन सोडविण्यासाठी धडपडणारी म्हणून रोटरीचे ओळख आहे,असे मत युनूस तांबोळी यांनी व्यक्त केले. माळशिरस तालूका अल्पसंख्याक शिक्षक व अधिकारी संघटना यांच्यावतीने रोटरीच्या पदाधिकार्याचा सत्कार अकलूज येथे करण्यात आला.
माळशिरस तालूका पंचायत समिती यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अल्पसंख्याक संघटनेचे तालुकाध्यक्ष अश्फाक मुलाणी,अमिरपाशा शेख,दिलावर तांबोळी, यास्मिन शेख, सोफीया शेख यांचा सत्कार रोटरीच्या पदाधिकार्याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पसंख्याक संघटनेचे तालुकाध्यक्ष अश्फाक मुलाणी यांनी अल्पसंख्याक संघटनेचे कार्य सांगितले. रोटरीचे अध्यक्ष ओजस दोभाडा , सचिव कल्पेश पांढरे, मनिष गायकवाड,केतन बोलावले,माजी सचिव गजानन जवंजाळ आदिंनी अल्पसंख्याक संघटनेच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी सोसायटीचे माजी सचिव प्रदीप अवताडे, जयविजय पतसंस्थेचे संस्थापक मिसाळ, सोसायटीचे संचालक प्रभारी केंद्रप्रमुख दगडू पवार जयविजय संघटनेचे अध्यक्ष विजय अस्वरे, प्राथमिक शिक्षक संघटना संभाजीराव थोरात गटाचे अध्यक्ष मनोहर एकतपूरे, संचालक हाके, एकनाथ कदम, अशोक राजगुरू उत्तम कुदळे आदिंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशपाक मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली निसार पठाण, अजमेर फकीर,मिनाज मुलाणी, बशीर मुलाणी,आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, आभारप्रदर्शन जावेद मुलाणी यांनी केले.