सोलापूर

बालहक्क जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ

 

बालहक्क जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ

सोलापूर, दिनांक 12 : जागतिक बालहक्क कामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभागाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या बालहक्क कामगार विरोधी दिनाच्या फलकाचे फीत कापून उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले, सरकारी कामगार आधीकारी एस. बी. डोबरीयल, जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी अविनाश मगर, धनाजी शिगाडे, लि. ट. प्रदीप पखमोडे, बाळासाहेब ठाकूर, राजेश्वर जाधव, गजानन मुंढे आदी उपस्थित होते.
यावेळी कामगार विभागाच्या वतीने या मोहिमेद्वारे नागरिकांना बालमजुरी निर्मूलनासाठी बांधिलकी दर्शविण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी पोस्टरवर स्वाक्षरी करून बालमजुरी विरोधी लढ्यात सहभाग नोंदवला.
बालमजुरी ही सामाजिक समस्या असून तिचे निर्मूलन करण्यासाठी प्रशासनाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी व्यक्त केले. शिक्षण हीच खरी ताकद असून प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
******

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button