सोलापूर
क्रांतीज्योती महिला पतसंस्था म्हणजे आर्थिक उन्नतीचे चांगले दालन.:-प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके
क्रांतीज्योती महिला नागरी पतसंस्थेचे नाझरे ते उद्घाटन संपन्न नाझरे प्रतिनिधी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन या महिला पतसंस्थेत महिला कामकाज करीत असून, पतसंस्थेचे संस्थापक रामचंद्र बनकर यांनी महिलांच्या हाती कारभार देऊन पतसंस्था उभी केली व त्याचा कारभार चांगला असून, त्यांनी महिला बचत गट करून पतसंस्था उभी केली व दुष्काळाची ओळख असणाऱ्या सांगोल्याची ओळख आता बंद होत चालली आहे व त्याचे भाग भांडवल, डिपॉझिट 17 कोटीच्या घरात म्हणजे ही पतसंस्था आर्थिक उन्नतीचे चांगले दालन आहे असे मत पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मा. प्रांतपाल प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी नाझरे ता. सांगोला येथे व्यक्त केले.
माझी आई शोभनतारा झपके या पहिल्या नगराध्यक्ष सांगोल्याच्या होत्या त्यावेळी त्यांनी रात्री, अपरात्री बापू साहेबांना घेऊन जकात नाके चेक करायचे त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली. अशीच साथ येथील क्रांतीज्योती च्या सर्व महिला पदाधिकारी यांना पुरुष मंडळींनी द्यावी व पतसंस्थेचा पारदर्शी कारभार करा व राजकारण विरहित काम करा असा मौलिक सल्लाही प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी यावेळी दिला.
सुरुवातीस पतसंस्थेचे उद्घाटन माता बालक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉक्टर सौ संजीवनी केळकर, सरपंच सौ मंदाकिनी सरगर, सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी, मा. प्रांतपाल प्रा, प्रबुद्ध चंद्र झपके, मार्गदर्शक सीए उत्तम बनकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीस पतसंस्थेचे संस्थापक रामचंद्र बनकर यांनी पतसंस्थेचे डिपॉझिट 17 कोटी असून लवकरच 20 कोटी पर्यंत जाईल असे सांगितले. यावेळी चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी, शिवाजी नाना बनकर, डॉक्टर संजीवनी केळकर, माजी उपसभापती सुनील चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास चेअरमन विजय राऊत, प्रकाश जाधव, साधू गोडसे, सर्टिफाइड ऑडिटर इब्राहिम मनेरी, अर्बन बँक संचालिका सौ उषाताई आदाटे, उद्योजक एसटी बनकर, शिवाजी गोडसे, जयसिंग पवार, दत्तात्रेय आदाटे, मदन रायचूरे, बाळासो बनकर, बसवेश्वर आदाटे, ऍड अमोल चांडोले, विक्रांत बनकर, सुशांत फुले, इंजिनीयर प्रवीण शिंदे, निरंजन फुले, प्रशांत राऊत, चंद्रकांत बनकर, सचिन बनकर, राहुल बनकर, उमेश बनकर, सोमनाथ बनकर, संभाजी बनकर, मा. प्राचार्य सुबराव बंडगर, तानाजी वाघमारे, कार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे, माजी सरपंच पिंटू बंडगर, हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, गोपाळ सरगर, उत्तम पाटील, विजय बंडगर, शिक्षक नेते अशोक पाटील, संजय बनसोडे, मच्छिंद्र भोसले, विजयकुमार गोडसे, शिवभूषण ढोबळे, नवनाथ बंडगर, माणगंगा संचालक दादासाहेब वाघमोडे, मार्केट कमिटी संचालक सचिन फुले, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, प्रगतशील बागायतदार सिताराम बनसोडे, गोरख भाऊ आदाटे, उपसरपंच सुवर्णा पाटील, गणीसो काजी, प्रणाम चौगुले, शशिकांत पाटील, युवा नेते नितीन रणदिवे, संजय सरगर, राजेंद्र बंडगर, चंद्रकांत बंडगर, पोपट जोंधळे, लक्ष्मण आलदर, मा उपसरपंच. भारत शेळके, सोसा. व्हाईस चेअरमन राजेभाऊ कोळेकर, शिवाजी बनकर, शिवाजी निंबाळकर, शाखाधिकारी तुषार बनकर, सीईओ गणेश माळी, पत्रकार रविराज शेटे, सुनील आडसूळ, अप्पू राज आदाटे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर टी. जी. बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, सल्लागार समिती विजय आदाटे, सुनील बनसोडे, कोंडीबा वाघमारे, डॉ. बाळासो धायगुडे, अजित अडसूळ, श्रीमती नयना पाटील, डॉ. चंद्रकला बाबर, पतसंस्था चेअरमन सौ. भाग्यश्री बनकर, वाय चेअरमन. दिपाली बनकर, संचालिका निलाबाई माळी, सो. सुशीला बनकर, सो. रेशमा बनकर, सौ. मनीषा बनकर, सौ. अश्विनी बनकर, सौ. अंकिता बनकर, सो राणी बनकर., सौ. गीता खडतरे, सौ वैष्णवी शिंदे, सो मनीषा बनकर, सौ तृप्ती बनकर, ऍड सो. चैत्रजा बनकर,, सो सीमा बंडगर, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक सुनील जवंजाळ तर आभार सुनील बनसोडे यांनी मानले.