महाराष्ट्र

बोंबाबोंब करून राज्य शासनाचा बार्शीत सकल मराठा समाजाने केला निषेध

बार्शी  : बार्शी शहर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध म्हणून बोंबाबोंब आंदोलन बार्शी तहसील कार्यालयासमोर केले. सकल मराठा समाजाचे युवा नेते संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद हे बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने गेले 55 दिवस झाले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लड्यास साथ देण्याकरता विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून टिकणारं आरक्षण द्यावे म्हणून वेळ दिला होता परंतु सदर वेळेत राज्य शासनाने आपला शब्द पाळला नाही म्हणून बार्शी तालुक्याच्या वतीने राज्य शासनाचा बोंबाबोंब करून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यास वेग देण्याकरिता व मनोज रंगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता काही दिवसापूर्वी वैराग येथे मराठा समाज बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता त्या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांवर वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी गुन्हे दाखल केले असून आंदोलकावर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना निलंबित करा अशी ही मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेऊन वाहनाचे नियोजन केले जाणार आहे  20 जानेवारीला बार्शी तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधव मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार असून मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा माघारी फिरणार नाही असे मत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष व सकल मराठा समाजाची युवा नेते आनंद काशीद यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button