महाराष्ट्र

माढा लोकसभा मतदार संघातून खासदारकीसाठी रासप स्वतंत्र लढणार राष्ट्र नायक महादेव जानकर  नातेपुतेत महादेव जानकरांचे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत

नातेपुते  :
“वन बुथ टैंन युथ” आणि  माढा लोकसभेच्या पुढील राजकीय रणनीती आखण्यासाठी तसेच माढा लोकसभा बुथ रचना व गट रचना प्रभावीपणे सक्षम करण्यासाठी  नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते येथे  माढा लोकसभा चर्चा सत्राचे आयोजन केले होते या कार्यक्रमास राष्ट्रनायक माजी मंत्री आ.महादेवजी जानकर साहेब तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा आणि वन बुथ टैंन युथ, जिल्हा परिषद गटयांची बैठक नातेपुते येथे घेण्यातआली
त्या प्रसंगी माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण -खटाव,फलटण-कोरेगाव विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी    नातेपुते  राष्ट्रीय समाज पक्षाचे माढा लोकसभा पदाधिकारी चर्चासत्र नातेपुते याठिकाणी राष्ट्र नायक राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नातेपुतेनगरीत रा स प चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री  राष्ट्र नायक महादेव जानकर यांचे आगमन झाल्यावर दहिगाव चौकात जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून कार्यकर्त्याने जंगी स्वागत केले. यावेळी प्रवक्ते संजय वलेकर यांनी नोटांचा हार घालून माजी मंत्री महादेव जानकर स्वागत केले.
मिरवणुकीने सर्वजण चैतन्य मंगल कार्यालय येथे गेले व त्या ठिकाणी
  चर्चासत्र सूरू झाले. यावेळी बोलताना रा स प चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर जानकर साहेब यांनी रासपच्या जनसुराज्य यात्रेला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळत आहे, यामुळे रासप भल्याभल्यांची सत्ता धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.  आणि रासप माढा लोकसभा हा माझा घरचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मी रासप कडून ताकदीने माढा लोकसभा लढवणार आहे. असे मत राष्ट्र नायक माजी मंत्री महादेव  जानकर व्यक्त केले.
यावेळी. राष्ट्रीय समाज पक्षचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रणजीत सुळ म्हणाले माढा लोकसभेसह सर्व विधासभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व निवडणुका रासप स्वबळावर लढणार आहेत. राष्ट्रनायक माजी मंत्री महादेवजी जानकर हे सर्व वंचित, कष्टकरी घटकातील जाती धर्माला सोबत घेऊन न्याय देण्याचे काम करत आहेत.जनस्वराज्य यात्रेस जिल्ह्या जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येणार काळ हा राष्ट्रीय समाज पक्षासाठी अतिशय चांगला आसेल त्यामुळे कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करून गाव तिथे शाखा बुथ तिथे कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी माढा लोकसभा बळकट करावाअसे आवाहन केले
याचवेळी माळशिरस विधानसभा मतदार संघातील आकरा जिल्हा परिषद आणि चार नगरपंचायतचा आढावा प्रवक्ते संजय वलेकर यांनी सविस्तर आकडेवारीनुसार माहिती देवून लोकसभा निवडणुकीत माळशिरस मधून जानकर साहेबाना भरगोस मतदान देवून मोलाचा वाटा उचलू आशी ग्वाही दिली
. यावेळी सर्वच तालुका प्रभरिनी आपल्या मतदार संघातील आढावा दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, लेगरे मामा, रामदास शेलार सर, माउली सलगर, संजय माने, सोमा मोटे, वैशालीताई वीरकर, बबन वीरकर, अजित पाटील,तज्जुद्दिन मनेर, खंडेराव सरक, संजय वलेकर राजाभाऊ वाघमोडे, रणजित सुळ, बाशिर काझी , उमाजी चव्हाण, शंकर शेंडगे, अमरजीत जानकर, सहदेव गोफणे, नारायण देवकाते, आबा मेटकरीसह  हजारो पदाधिकारी कार्यकर्ते या चर्चासत्रासाठी उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित सुळ यांनी तर सूत्रसंचलन विकास किसवे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button