महाराष्ट्रसोलापूर

लिता पंचमी निमित्त बनशंकरी नवरात्र मंडळात कुंकुमार्चन

सोलापूर :
श्री बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळ व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, शेळगीच्या वतीने ललिता पंचमीनिमित्त कुंकुमार्चन कार्यक्रम घेण्यात आला.
              नवरात्रीत, विशेषतः ललिता पंचमीला देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.
                यावेळी ट्रस्ट अध्यक्ष राजशेखर रोडगीकर, आधारस्तंभ सुरेश हत्ती, उत्सव अध्यक्ष दीपक भैरप्पा, उपाध्यक्ष ओंकार देशेट्टी, अंबादास बिराजदार, सुरेश चारी, सराजेश सवळी, महेश करपे,  प्रफुल्ल शेट्टी, डॉ. महेश दुलंगे सुजाता जाधव, प्रणाली शेट्टी, शोभा चारी, सुमन चारी, जगदेवी शेट्टी, शोभा धूत, संगीता पारीख, संगीता लाहोटी, मीना जाधव, सुनीता करपे,संतोषी करपे, सिमा होसाळे, दीपा होसाळे, राजश्री होसाळे, शैला डिडवाणी, मानसी दुलंगे आणि शेळगी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
               कार्यक्रमाचे पौरोहित्य संगमेश्वर पुराणिक व शेखर स्वामी यांनी केले तर मंत्रोच्चार सुनीता अंबुलगे यांनी केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महेश होटकर, महेश झंपा, अनिकेत जाधव, मंदार चारी, सिद्धेश्वर हिरेमठ, प्रदीप भोसले, स्वयंम माळगे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button