सोलापूर

शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांचा जि.प.वर मोर्चा

विविध मागण्यांचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन

 

शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांचा जि.प.वर मोर्चा विविध मागण्यांचे सीईओंना निवेदन

सोलापूर : शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मागण्या पुढील प्रमाणे प्रलंबित आहेत. त्या तातडीने सोडवाव्यात यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या मागण्या चर्चेव्दारे तातडीने सोडवाव्यात ही मागणी यावेळी करण्यात आली. डाॅ प्रवीण मस्तूद, काॅ तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

. सोलापूर जिल्हयातील शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा पगार वेळेवर होत नाही तो वेळेवर मिळावा, मागील ७ महिन्यांचे थकीत वेतन तातडीने आदा करावे.. कंत्राटपध्दतीचा गैरवापर करून स्वयंपाकी व मदतनीस यांना कामावरून कमी केले जाते ही चूकीची पध्दती बंद करावी.शालेय पोषण आहार कर्मचारी यांना ड्रेस कोड ठरवावा व त्यासाठी त्यांना १०००/- रूपये मिळावे.शालेय पोषण आहार कर्मचारी यांना १०००/- बोनस मिळावा. आयकार्ड मिळावे. पहिली ते चौथी पर्यंतच्या एका विद्यार्थ्यांमागे २.५९ रूपये व पाचवी ते आठवी पर्यंतच्या एका विद्यार्थ्यामागे २.८९ रूपये प्रामणे इंधन व भाजीपाला सर्व रक्कम शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या बॅंक आकउंटवर जिल्हापरिषदे व्दारे ट्रान्फर करण्यात यावेत.यासह राज्यस्तरावरील मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.मोर्चेकर्‍यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button