सोलापूर

बांधकाम क्षेत्रातील युवराज चुंबळकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

 

*बांधकाम क्षेत्रातील नेतृत्वाचा गौरव; युवराज चुंबळकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*

सोलापूर : ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ सोलापूर सेंटरचे व्हाईस चेअरमन तथा वैष्णवी मल्टीकॉन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक मा. श्री. युवराज चुंबळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. सुधीर खरटमल यांच्या शुभहस्ते जोडबसवण्णा चौक येथील कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी सुधीर खरटमल यांनी युवराज चुंबळकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या बांधकाम व उद्योजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बांधकाम आणि ग्राहकांचा विश्वास यांचा समन्वय साधत व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उद्योजक म्हणून युवराज चुंबळकर यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी तसेच वैष्णवी मल्टीकॉन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून दर्जेदार बांधकाम क्षेत्रात त्यांनी केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. भविष्यातही त्यांच्या हातून उद्योग, समाज आणि शहराच्या विकासासाठी भरीव कार्य घडावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

सत्काराला उत्तर देताना युवराज चुंबळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि मिळालेल्या शुभेच्छांमुळे भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

यावेळी बंडा प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी.बिराजदार, सूर्यकांत शेरखाने, प्रा.राहुल बोळकोटे, सुनील इंगळे, सलीम दर्जी, इरफान शेख, अजमल शेख, द्वारकादास तावनीया, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रविण वाडे, पुरुषोत्तम श्रीगादी, रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकधोंड, नागेश जामगोंडे यांच्यासह मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी युवराज चुंबळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी, निरोगी व उज्ज्वल भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button