सोलापूर

डीसीसी बॅंक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

जनतेच्या मनात अकार्यक्षम ठरलेल्या पालकमंत्र्यांकडे सगळ्यांचे लक्ष

 

डीसीसी बॅंक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याला चांगला पालकमंत्री देण्याची मागणी केली होती. सोलापूरला शेतीची जाण असलेला, जिल्ह्याला वेळ देणारा आणि जनतेचे म्हणणे समजून घेणारा पालकमंत्री मिळावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या टीकेला भाजपचे नेते आणि माजी आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पालकमंत्री बदलणं तुमच्या बस की बात नाही, असा टोला सातपुतेंना मोहिते पाटलांना लगावला आहे.

पालकमंत्री बलदणे तुमच्या बस की बात नही है असं म्हणत राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. एकहाती या जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्यांची, सामान्यांची गोरगरीबांची काळजी जयाभाऊ घेत आहेत त्यांच्या मागे सगळा जिल्हा असल्याचे सातपुते म्हणाले. शेतकऱ्याचा, शेतमजुराचा मुलगा राज्याचा ग्रामविकास मंत्री होतो, जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना मळमळ होणं स्वभाविक आहेत असे सातपुते म्हणाले. जिल्ह्याचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे काय? असा सवाल सातपुतेंनी मोहिते पाटलांना केला. देवाभाऊंचा विश्वास शिलेदार म्हणन जयकुमार गोरे काम करत असल्याचे सातपुते म्हणाले. या जिल्ह्याला कामाचा पालकमंत्री भेटला असल्याचे सातपुते म्हणाले. जयाभाऊंच्या तिथे आरती करायला नारायण पाटील, अभिजीत पाटील होते, सिद्धाराम म्हेत्रे, शहाजीबापू पाटील होते असेही ते म्हणाले. मलाही तिथे बोलावले होते असे सातपुते म्हणाले.

तुम्ही सगळ्या संस्था मोडीत काढल्या, अशी टीका करत त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी संपूर्ण सोलापूर जिल्हा असल्याचा दावा केला. मोहिते पाटील विरुद्ध गोरे हा संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. पालकमंत्री बदलण्याची मागणी करणाऱ्या मोहिते पाटलांना सातपुतेंनी थेट प्रत्युत्तर दिल्याने आगामी काळात राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राम सातपुते यांनी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर देखील टीका केली. गेल्या काही दिवसांत जानकर यांची भाजपशी आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सातपुतेंनी त्यांच्यावर टीका केली. कोणी जर एखादा उगाच येऊन गळ्यात पडत असेल, तर कोणी गळ्यात घेत नसतं असा टोला सातपुतेंनी जानकरांना लगावला आहे. परंतु धैर्यशील मोहिते पाटलांनी पालकमंत्र्यावर केलेली टीका आणि त्या टिकेला सातपुतेने दिलेला उत्तर याचा अर्थ मी पालकमंत्र्याच्या किती जवळ आहे मी ज्या पक्षात आहे तो पक्ष माझा कुठलाही शब्द मोडत नसल्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या बोलण्यातून दिसून आले.

मोहिते पाटील समर्थक हे राम सातपुते यांना कुठलेही प्रतिक्रिया देत नाही परंतु सोशल मीडियावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची हे बीडचं पार्सल माळशिरस मधून बीडला पाठवलं असे असलेली ऑडिओ क्लिप मात्र मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि त्याच अनुषंगाने राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या विरोधात किती जरी गरड ओकली तरी ती शून्यच असल्याचे बोलले जात आहे

एकंदरीत खासदार धैर्यशील  मोहिते पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्यावर केलेली टीका ही या ठीकेची जिल्हाभर चर्चा होत असून जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी आणला असे जरी पालकमंत्री ठणकावून सांगत असले तरी देखील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये निधीसाठी किती बोंबाबोंब चालू आहे पालकमंत्री कार्यक्षम आहेत ते अकार्यक्षम हे जनतेतून बोलले जात आहे वास्तविक पाहता सोलापूर शहराला नियमित रोज स्वच्छ पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे सोलापूर शहर व जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसायाचा होत आले आहे सर्वसामान्य नागरिकांना शालेय शिक्षण आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसताना राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः किती कार्यक्षम आहेत हे जनता बोलून दाखवत आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून राजकीय पटलातून बाहेर फेकले गेलेले मोहिते पाटील व त्यांचे समर्थक विजयाची जादू दाखवणार असे बोलले जात आहे तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपची डीसीसी बँक ताब्यात मिळणार की जाणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button