सोलापूर

लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेल्या अष्टविनायक नगरला प्रणितीताईंचा आधार

८.४७ लाखांचा सभामंडप मंजूर

 

२५ वर्षे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेल्या अष्टविनायक नगरला प्रणितीताईंचा आधार – ८.४७ लाखांचा सभामंडप मंजूर

सोलापूर  :- सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरातील अष्टविनायक नगर सह. गृह. संस्था, म्हाडा कॉलनी येथे तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सभामंडपाचे भूमिपूजन झाले. खा. प्रणितीताई शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून सन २०२६-२७ अंतर्गत ८ लाख ४७ हजार २५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूरच्या देखरेखीखाली हे काम होणार असून कामाचा प्रारंभ आदेश सप्टेंबर २०२६ मध्ये देण्यात आला आहे.
चेअरमन विश्वनाथ व्हनकोरे यांचा आक्रमक घणाघात –

यावेळी प्रास्ताविक करताना चेअरमन विश्वनाथ व्हनकोरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांचा पर्दाफाश केला.
ते म्हणाले, _”संस्था स्थापन होऊन २५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या २५ वर्षात प्रभाग २४ जुळे सोलापूर, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सर्व पक्षीय आमदार, खासदार, नगरसेवक, महापौरांना निवेदन दिले, दारोदार फिरलो, पण कोणीही एक दमडी दिली नाही. सर्वांनी आमच्या सोसायटीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आज आम्हाला आनंद आहे की, खा. प्रणितीताई शिंदे यांनी शब्द नाही तर कृती केली – खासदार फंडातून १० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.”_
सोसायटीच्या वतीने त्यांनी प्रणितीताईंचे जाहीर आभार मानले.

लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेल्या अष्टविनायक नगरला प्रणितीताईंचा आधार
भूमिपूजन सोहळा थाटात –
खासदार प्रणितीताई शिंदे यांचा सत्कार ॲड. देवयानी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. त्यानंतर प्रणितीताईंच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडला.
या सोहळ्यास सोसायटीचे सचिव व्यंकटेश वैकुंठे, खजिनदार सुभाष सदाफुले, ज्येष्ठ संचालक मोहन डांगे, मारुती कटारे, गौरीशंकर जेऊरे, सुनील सुरवसे, संचालिका रेखा गायकवाड, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनम कोळी, संध्या जाधव, उषा व्हनकोरे, तसेच माळगे, कटारे, भुतनळी, तिर्थ, घाडगे, पाटील, पवार, सुरवसे, कुलकर्णी, ढगे यांचे सह कुटुंबीय आणि अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते व स्नेहल पार्क येथील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभामंडपामुळे आता अष्टविनायक नगरवासीयांना सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button