शिव निर्णय / मोहोळ : भाजपच्या मोहोळ महिला आघाडीच्या शहराध्यक्ष श्रीमती अंजली मोहिते यांनी शनिवारी काँग्रेस भवन सोलापूर येथे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे , सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे मोहोळ भाजपाला चांगला हादरा बसला आहे.यावेळी मोहोळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर राजे पवार, मोहोळ तालुका महिला अध्यक्षा सौ.अंजलीताई वस्त्रे, जिल्हा ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष हाजी बिलाल शेख उपस्थित होते. सुशील कुमार शिंदे डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील यांनी अंजलीताई मोहिते काँग्रेस पक्षात स्वागत केले.व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.




More Stories
राजन पाटील यांच्या मंत्रीपदामुळे पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व सिध्द होणार का ?
Karjat Election 2024: अपक्ष उमेदवार सुधाकर घारे इतिहास घडवणार?
लोकसभा निवडणूकीत तुम्ही मला साथ दिलात, भविष्यात मी तुम्हाला नक्कीच साथ देईन : खा. प्रणितीताई शिंदे